शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्राची एकसंधता विखुरण्यासाठी जातीच राजकारण चालवलं जातंय; राज ठाकरेंची टीका

By विश्वास मोरे | Updated: January 7, 2024 17:24 IST

वीज, पाणी, रस्ते तीच आश्वासने दिली जात आहेत. आम्ही पुढे कधी जाणार, मला निवडणुका लढवताना आता लाज वाटते.

चिंचवड : आज जाती-पातीच राजकारण जे चालत आहे, ते स्वतःहून चालत नाही आहे. ते चालवले जात आहे, महाराष्ट्र एक संघ राहू नये, याच्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत आणि आपणं गाफील आहोत. काही नेते सगळं घडवून आणत आहे,  एकत्रीकरण विसरून टाकण्याचे काम केले जात आहे, अशी टीका मनसेचे राज ठाकरे यांनी चिंचवड येथे केली. 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत झाली. प्रसिद्ध नाटककार आणि अर्थतज्ञ डॉ. दीपक करंजकर यांनी नाटक आणि मी या विषयावर ठाकरे यांची मुलाखत घेतली. नाट्य संस्कृती, सध्या सुरू असणाऱ्या जातीपातीचे राजकारण, कलावंतांचा सन्मान, आवडणार नाटक, कलाभान जपण्याची गरज आहे, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली.

एकेमकाना आद्या पाद्या अंड्या अशा हाका मारू नका!

नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावर राज ठाकरे काही कलावंतांचे कान टोचले. ठाकरे म्हणाले, बाहेरच्या राज्यातील कलावंत पाहतो आणि आपल्या कलावंता मध्ये काही फरक आहेत. एकमेकांना मान दिला नाही , एकेमकाना आद्या पाद्या अंड्या अशा हाका मारू नका. रजनीकांत आणि इलाही राजा एकत्र बसून दारू पीत असतील, पण सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना खूप सन्मान देतात.''

ठाकरे म्हणाले, शरद पवार आता समोर आले, तर मी त्यांना वाकून नमस्कार करीन, कारण ते एक बुजुर्ग नेता आहेत  व्यासपिठावर काय बोलेन!  हा भाग वेगळा सन्मान द्यावा लागतो.''

आपण पुढे कधी जाणार

राज ठाकरे म्हणाले, गेली ७० वर्ष माझा आजोबा, काका हेच म्हणायचे. मी तेच म्हणतोय.  विज पाणी रस्ते तीच आश्वासने दिली जात आहेत. आम्ही पुढे कधी जाणार. मला निवडणुका लढवताना आता लाज वाटते. 

जमीन चलाखीने विकत घेतली जातीय!

ठाकरे म्हणाले, मी बोलत राहणार, सतत बोलत राहणार मराठी माणसाला जागं करत राहणार आहे. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे , जमीन चलाखीने विकत घेतली जातीय. शिवडी-न्हावा -शेवा रस्ता होईल तर रायगड जिल्हा बरबाद होईल.'

सुशिक्षितांनी राजकारणात यायला हवे! 

ठाकरे म्हणाले, मध्यमवर्गीयांना राजकरणात आणि समाजकारनात यावं लागेल. केवळ सुशिक्षत होऊन चालणार नाहीत तर सुज्ञ असावे लागेल. बहिणाबाई चौधरी ह्या अशिक्षित होत्या मात्र त्या सुज्ञ होत्या  तुमची जमीन म्हणजे तुमचं अस्तित्व ,जमीन गेली भाषा गेली तर कोण तुम्ही ?''

मतदारांनी चुकाना चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला हव,  जे चुकले ते त्यांना घरी बसवा!

नाट्य क्षेत्र समृध्द करण्यासाठी मी पुढाकार घेईल राजकरण्याना सांगेन तुम्ही एकत्र तर या. आपल्या बलस्थानामध्ये नाट्य क्षेत्र प्रथम हे समजून घ्या हे वाढवायला हवं , हे नाही करणार तर उपयोग काय ? महाराष्ट्राने पुन्हा एकदा मोठा विचार केला पाहिजे. शिक्षा देत नाही तोपर्यंत सुधारणा होत नाही, मतदारांनी चुकाना चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला हव, जे चुकले ते त्यांना घरी बसवा.''

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेartकलाMaharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिकPoliticsराजकारण