शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नोटीसनंतरही अवैध बांधकामे न हटविणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 15:11 IST

महापालिकेच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे दिघीतील तीन मिळकतधारक आणि भोगवटाधारकांविरूद्ध पोलिसांनी महापालिका प्रांतिक व नगररचना अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

पिंपरी : अनधिकृत बांधकामे स्वत:हून काढून टाकावीत, असे महापालिकेतर्फे नोटीस दिल्यानंतरही त्याकडे मिळकतधारक दुर्लक्ष करतात. महापालिकेच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे दिघीतील तीन मिळकतधारक आणि भोगवटाधारकांविरूद्ध पोलिसांनी महापालिका प्रांतिक व नगररचना अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मनोहर मेटांगे, नम्रता देवेंद्र पाटील, सचिन भिमराव लांडे अशी गुन्हा दाखल झालेल्या मिळकतधारकांची नावे आहेत. त्यांनी गाडगेनगर, डुडुळगाव येथे केलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात अनिल देवराम शिंदे (रा. श्रीरामनगर, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. या मिळकतधारकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार शिंदे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. महापालिकेने या मिळकतधारकांना २१ आॅगस्टला नोटीस बजावली होती. १ नोव्हेंबर २०१८ पर्यंत मिळकतधारकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकामे पाडुन टाकावीत. अशी मुदत नोटीसमध्ये देण्यात आली होती. मुदत संपुष्टात आल्यानंतरही मिळकतधारकांनी अनधिकृत बांधकामे हटवली नाहीत. त्यामुळे या मिळकतधारकांवर दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी नोटीस मिळाल्यानंतरही अनधिकृत बांधकाम पाडुन न टाकल्यास पुढील कारवाई होत नव्हती. दिघीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मात्र नोटीसमध्ये दिलेल्या मुदतीत मिळकतधारकांनी अनधिकृत बांधकाम पाडुन न टाकल्याने त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात आली आहे.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdighiदिघीPuneपुणे