शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतून चोरी करून बीडमध्ये विक्री, ४४ दुचाकी जप्त; चोरीचे वाहने खरेदी केल्याने गुन्हा दाखल

By रोशन मोरे | Updated: April 8, 2023 17:52 IST

कमी किंमतीत दुचाकी मिळतात म्हणून त्या खरेदी करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल ...

पिंपरी : कमी किंमतीत दुचाकी मिळते म्हणून विकत घेताना ती चोरीची नाही ना, याची खात्री करा. कारण वाकड पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या पाच चोरट्यांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून २१ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या तब्बल ४३ दुचाकी जप्त केला. एका जिल्हातून दुचाकी चोरून दुसऱ्या जिल्ह्यात विकणाऱ्या या चोरट्यांवर पोलिसांनी कारवाई केलीच. शिवाय कमी किंमतीत दुचाकी मिळतात म्हणून त्या खरेदी करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या दुचाकी चोरट्यांनी नावे केशव महादेव पडोळे (वय २५, रा. बोडकेवाडी, माण, मुळगाव- केशसांगवी, आष्टी, बीड), नवनाथ सुरेश मेटकुळे (रा. थेरगाव, मुळगाव- पाथर्डी,नगर), ऋषिकेश अजिनाथ भोपळे (वय २३, रा. आष्टी, बीड), अमोेल दगडू पडोळे (वय २४, रा.केळसांगवी, बीड) याला अटक केली असून नितीन राजेंद्र शिंदे (वय २०, रा. शेकापूर शिेंदेवस्ती, आष्टी, बीड) याला ताब्यात घेतले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तापकीर मळा चौक येथे दुचाकीचोर दुचाकीची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्याप्रमाणे प्रमाणे सापळा रचून नितीन शिंदे याला ताब्यात घेतले. त्याने दुचाकीचोरीचा मुख्य सुत्रधार केशव महादेव पडोळ असल्याचे सांगितले. पोलिसानी कारवाई करत आरोपींना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव पडोळे हा पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचालक म्हणून काम करतो. नवनाथ मेटकुळे तसेच इतर साथीदारांनी चोरलेल्या दुचाकी तो नगर येथे घेऊन जात होता. तेथून तो पुढे आरोपी अमोल आणि ऋषिकेशच्या मदतीने चोरीच्या दुचाकी बीडमध्ये विक्री करत होता.

बीडच्या ग्रामीण भागात विक्रीआरोपी कमी कमीत दुचाकीची विक्री बीडच्या ग्रामीण भागात करत होते. अगदी कमी किंमतीती दुचाकी मिळत होती म्हणून अनेक जण ती खरेदी करत होते. कागदपत्रांबाबत दुचाकी घेणाऱ्याने विचारणा केली असता. कागदपत्र लवकरच देऊ असे आश्वासन देत होते.

चोरट्यांकडून जप्त केलेल्या दुचाकीेचे दाखल गुन्हे

वाकड पोलीस ठाणे - १४

हिंजवडी पोलीस ठाणे -४

बारामती शहर पोलीस ठाणे - ८

रांजनगाव एमआयडीसी पोलीस ठाणे - ३

अहमदनगर कॅम्प पोलीस ठाणे - २

पाथर्डी पोलीस ठाणे - १

कर्जत पोलीस ठाणे - १

कोतवाली पोलीस ठाणे, अहमदनगर - १

श्रीगोंदा पोलीस ठाणे - १

वाळुंज एमआयडीसी पोलीस ठाणे, औरंगाबाद - १

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड