शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून घोषणा दिल्याने आणखी एक गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 13:00 IST

काळेझेंडे दाखवून घोषणा दिल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा

पिंपरी : विधानसभेचे विरोधी पथनेता देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या हस्ते शहरात रविवारी (दि. ६) विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण झाले. यावेळी आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. फडणवीस यांच्या शहरातील दौऱ्यावेळी काळेझेंडे दाखवून घोषणा दिल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला. 

संतोष लांडगे, सौरभ लांडगे, मारुती लांडगे, प्रशांत पवार, संजय उदवंत, राजेंद्र हरिश्‍चंद्र बिराजदार, नाना लांडगे, रणू बिराजदार, डंगू शिंदे, परशुराम पवार, अमर बिराजदार, अमित गुप्ता, शेखर गव्हाणे, चिम्या लांडगे (सर्व रा. धावडे वस्ती, भोसरी) आणि इतर १५ ते २० जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी सुरेश वाघमोडे यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. ९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. फडणवीस हे या उद्घाटनासाठी रविवारी (दि. ६) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास कार्यक्रम स्थळी आले असता आरोपींनी आंदोलन केले. काळे झेंडे तसेच घोषणा लिहिलेले फलक आरोपींकडे होते. ‘फडणवीस गो बॅक, भ्रष्टाचारी पिंपरी-चिंचवड भाजपा, अशा प्रकारचे फलक हातात घेऊन आरोपींनी घोषणाबाजी केली. आरोपींनी घोषणा देत शांततेचा भंग केला, असे फिर्यादी नमूद आहे.    

दरम्यान, फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन केल्याप्रकरणी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विरोधात चिखली आणि भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच फडणवीस यांचा वाहनांचा ताफा कार्यक्रमस्थळी पोहचत असताना त्यांच्या वाहनाच्या दिशेने चप्पल फेकण्यात आली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड