शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्याच्या नगराध्यक्षांना दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 12:44 IST

लोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांना एका भोंदूबाबानं त्यांच्या घरात घुसून केलेली तक्रार मागे घेण्यासाठी शिवीगाळ करत दमदाटी केली होती. सुरेखा जाधव यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देभोंदूबाबा संतोष पिंजणनं नगराध्यक्ष यांच्या घराबाहेर ठेवला होता तिरडीचा उताराभोंदूबाबाविरोधात लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलभोंदूबाबानं नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांना त्यांच्या घरात घुसून दिली धमकी

लोणावळा : लोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांना एका भोंदूबाबानं त्यांच्या घरात घुसून केलेली तक्रार मागे घेण्यासाठी शिवीगाळ करत दमदाटी केली होती. सुरेखा जाधव यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संतोष पिंजण असे या भोंदूबाबाचे नाव असून त्याच्याविरोधात भादंवी कलम 504 व 506 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी या भोंदूबाबानं सुरेखा जाधव यांच्या वळवण येथील घराबाहेर तिरडीचा उतारा ठेवून त्यामध्ये त्यांच्या मृत्यूची वेळ व ठिकाण नमूद केले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर लोणावळ्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. घडल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवण्यासाठी सुरेखा जाधव यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

यानंतर दोन दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरात घुसून पोलिसात केलेली तक्रार मागे घ्या, नाही तर बघून घेऊन, असं सांगत शिविगाळ करत या भोंदूबाबानं त्यांना दमदाटी केली. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, लोणावळ्यातील दोन जणांनी मला हे कृत्य करायला लावले असल्याचे भोंदूबाबा संतोष पिंजणनं आपल्या जबाबात म्हटले होते. पण आता जबाब बदल त्यानं अन्य तीन जणांनी मला हे करायला लावले असल्याचे सांगितल्यानं पिंजण हा पोलीस प्रशासन व सर्वांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे पिंजणनं हे सर्व काही प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलं की कुणी त्याच्याकडून हे करवून घेतले आहे का? या दिशेनं पोलीस प्रशासनाने गांर्भीयानं तपास करत खरा आरोपी जनतेसमोर आणावा, अशी मागणी नगराध्यक्ष सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड