शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कठड्याला धडकून कार पडली नदीत ; वडगाव मावळ येथील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 16:49 IST

पुलावरील कठड्याला धडकून कार पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना वडगाव मावळ येथे घडली आहे.

वडगाव मावळ : भरधाव कार पूलाचा कठडा ताेडून इंद्रायणी नदीत पडल्याची धक्कादायक घटना वडगाव मावळ भागात घडली आहे. या कारमधील एक युवक पाेहत पुलाजवळ आला असून नागरिकांनी त्याला बाहेर काढले. कारमधील इतर दाेन युवकांचा शाेध घेण्यात येत आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली.   

एका कारमधून तीन युवक टाकवेकडे जात असताना येथील इंद्रायणी नदीवरील पुलावरील खड्डे आणि खडीवरुन घसरुन कार पुलाच्या कठड्याला धडकून नदीत पडली. कारमधील युवक संजय ढगे (वय 20) हा पाण्यातून पाेहत पुलाजवळ आला. त्याला नागरिकांनी दाेरीच्या सहाय्याने बाहेर काढले. तर त्याचे इतर साथिदार अक्षय मनाेहर जगताप ( वय 20) व संकेत नंदू जगताप (वय20 ) हे कारसाेबत वाहत गेले असून इंद्रायणी नदीत त्यांचा शाेध एनडीआरएफचे जवान घेत आहेत. 

नागरिकांनी  दिलेल्या माहितीनुसार  कारने तीघेजन टाकवे कडे जात असताना पुलावर मोठमोठे खड्डे झाले असून संपूर्ण खडी रस्तावर पसरली आहे. ब्रेक मारल्यानंतर  कार घसरत पुलाला धडकून पाण्यात पडली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर व त्यांची टीम दाखल झाली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडriverनदीNational Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल