शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आयटीनगरीत गांजाचा व्हायरस! हिंजवडी, वाकड आणि बावधनमध्ये पोलिसांच्या सर्वाधिक कारवाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 12:55 IST

शहरातील उच्चभ्र परिसराला अंमली पदार्थाच्या सेवनाचा विळखा...

- तेजस टवलारकर

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याचे दिसून येत आहे. विशेषत: शहरातील उच्चभ्रू भागात गांजा आणि अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याची स्थिती आहे.

वाकड, निगडी, बावधन, हिंजवडी या परिसरात गांजा आणि अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी सर्वाधिक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीसांतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शहरात मागील पाच महिन्यात अंमली पदार्थ सेवन आणि बाळगल्याप्रकरणी ३३ गुन्हे दाखल झाले असून, ५७ आरोपींना पकडण्यात आले आहे.

शहरात शिक्षण घेणाऱ्यासाठी येणारे विद्यार्थी, आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी याच परिसरात मोठ्या संख्येने राहतात. हाच वर्ग आपला ग्राहक बवनिण्यासाठी अंमली पदार्थ तस्कर प्रयत्न करीत असतात. विशेषत: तरूण वर्गाला हेरून त्यांच्या मार्फत अंमली पदार्थ पोहोचविले जातात. अंमली पदार्थांमध्ये गांजा हा सर्वात कमी किमतीत मि‌ळतो. त्यामुळे गांज्यांचे सेवन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंमली पदार्थ विरोधी पथक कार्यरत आहे. या पथकामार्फत अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मागील काही वर्षात शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय आहेत. परिणामी बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मागील काही वर्षात पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ तस्करांंचे महत्वाचे  केंद्र बनल्याची स्थिती आहे. शहरात या पदार्थांचे होते सेवन? गांजा ब्राऊन शुगरमेफेड्रोन ( एमडी ) बंदी असलेल्या सिगारेट तरूणांना केले जातेय लक्ष? शहर परिसरात आतापर्यंत केलेल्या कारवाई २० ते ४५ या वयोगटातील व्यक्ती अंमली पदार्थांचे सेवन करताना आणि बाळगताना  मिळून आले आहेत, अशी माहिती अंमली विरोधी पथकाने दिली. देशभरातील अनेक तरूण शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरूणांची संख्या शहरात जास्त आहे. या वर्गाला पगार देखील मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे अशा तरूणांना अंमली पदार्थ्यांचे सेवन करण्यासाठी लक्ष केले जात असल्याचे दिसून येतं. येथून येतो शहरात गांजा ओडिशाकर्नाटकआंध्रप्रदेश शिरपूरज‌ळगाव 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकड