शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

‘द्रुतगती’वरील दरडी हटविण्याची मोहीम; खंडाळा एक्झिट ते बोगद्यादरम्यानच्या कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 6:15 AM

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील एक किलोमीटर अंतरामध्ये डोंगरावरील धोकादायक व सैल झालेले दगड व माती हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे.

लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील एक किलोमीटर अंतरामध्ये डोंगरावरील धोकादायक व सैल झालेले दगड व माती हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे.या कामाकरिता खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्यापर्यंत मुंबईकडे जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. एक्सप्रेस वेवरील दरडप्रवण क्षेत्रातील खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगदा, अमृतांजन पूल, आडोशी बोगदा, भातन बोगदा येथील एकूण दोन किलोमीटर अंतरावरील धोकादायक सैल दरडी हटविणे व संरक्षकजाळ्या बसविण्यात येणार आहेत. या मोहिमेचा कालावधी दीड वर्षाचा आहे. या कामासाठी अंदाजे ६५ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले.एक्सप्रेस वेवरील घाटमाथा परिसरातील दरडप्रवण क्षेत्रातील धोकादायक सैल दरडी हटविणे व संरक्षक जाळ्या बसविण्याच्या मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. या मोहिमेत खंडाळा एक्झिट ते भातन बोगद्यापर्यंत चार ठिकाणी मोहीम राबविण्यात येणार आहे. खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगदा (किलोमीटर क्रमांक ४७.९१० ते ४६.९१०) एक किलोमीटर अंतर, अमृतांजन पूल परिसरातील १९० मीटर अंतर, आडोशी बोगद्याजवळील २१५ मीटर अंतर, तसेच भातन बोगदा परिसरातील १५९ मीटर असे १५६५ मीटर अंतरावर नव्याने व मागील मोहिमेतील अपूर्ण राहिलेल्या ४६५ मीटर असे २०३० मीटर अंतरावरील सैल झालेल्या दरडी हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ६५ कोटी रुपये खर्च होणार असून, हे काम पायोनिअर फाउंडेशन इंजिनिअर प्रा. लिमिटेड या कंपनीला दिले आहे. यापूर्वी या कंपनीने माळशेज घाटातील दरडी हटविण्याचे काम केले आहे.आठ किमीवर आठ ठिकाणे धोक्याचीदोन वर्षांपूर्वी २२ जून व १९ जुलै २०१५ रोजी एक्सप्रेस वे वरील खंडाळा (बोरघाट) घाटातील खंडाळा व आडोशी बोगद्याच्या तोंडाजवळ मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. या नैसर्गिक दुर्घटनेत आडोशी बोगदा येथे तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. पाच प्रवासी गंभीर जखमी झाले होते. आडोशी बोगद्याच्या दरडीच्या अगोदर २२ जूनला खंडाळा बोगद्याजवळही मोठी दरड कोसळली होती. या घटनेत दोन वाहनांचे नुकसान वगळता जीवितहानी झाली नव्हती. दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. या दोन्ही घटनांसह अवघ्या दीड महिन्यात घाटातील खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्यापर्यंतच्या आठ किलोमीटर अंतरावर पाचवेळा दरडीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे घाटमाथा परिसरात एक्सप्रेस वेवरून प्रवास करणे धोकादायक बनले होते.खंडाळा घाटातील आठ किलोमीटर अंतरावरील दरडप्रवण क्षेत्रात कोणत्याही क्षणी दरड कोसळेल अशी भीती प्रवाशांमध्ये पसरल्याने या मार्गावरून प्रवास करणे असुरक्षित बनले होते. सातत्याने कोसळणाºया दरडीमुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूक अनेक दिवस विस्कळीत झाली होती. घाटमाथा परिसरातील डोंगर पठारावरील अत्यंत धोकादायक दरडीच्या ठिकाणांची भूवैज्ञानिक तज्ज्ञाच्या मार्फत पाहणी केली होती. त्यांच्या पाहणी अहवालानुसार खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्यापर्यंतच्या आठ किलोमीटर अंतरावरील एकूण आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती.या आठ ठिकाणी सैल झालेल्या दरडी व त्या ठिकाणी पुन्हा दरडी कोसळू नये यासाठी डोंगर पठारावर संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला गतवर्षी २७ जुलैला सुरुवात करण्यात आली होती. या कामाला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला आहे. त्या कामासाठी सुमारे ५२ कोटी खर्च करण्यात आला आहे. हे काम मेकाफेरी कंपनीने स्पॅनिश व इटलीच्या तज्ज्ञ कामगारांच्या मदतीने पूर्ण केले आहे. मात्र, तज्ज्ञांनी निश्चित केलेल्या ठिकाणाशिवाय इतर ठिकाणी दरडीचा धोका निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत उपाययोजना राबविण्यासंदर्भात संबंधितांनी सूचित केले होते.कामादरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावेएक्सप्रेस वेवरील दरडप्रवण क्षेत्रात धोकादायक दरडी हटविणे व संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला रस्तेविकास महामंडळाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. कामादरम्यान सुरक्षेसाठी कामाच्या ठिकाणची एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. जसजसे काम होईल, तशी बंद करण्यात आलेली लेन पुन्हा वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल. कामाच्या वेळी होणाºया गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी यांनी केले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा