शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

नादाला वय नसतं! सत्तरीच्या मधुकर पाचपुतेंच्या घोडेस्वारीचा अंगावर शहारा आणणारा क्षण कॅमेरॅत; VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 15:45 IST

शर्यतीला सुरूवात झाली अन् मधुकर पाचपुते यांची अदाकारी सुरू झाली. घोडेस्वारी करतांना नाना पाचपुते यांची ती अदाकरी, तो थाट, एखाद्या विशितल्या पोरालाही लाजवेल, असाच चित्तथरारक होता.

ज्ञानेश्वर भंडारे -

पिंपरी - बैलगाडा शर्यती (Bullock cart race) पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. हे प्रयत्न कशासाठी होते याचे उत्तर मावळातील नाणोली घाटात झालेली शर्यत पाहिली की सर्वांना येईल. या वेळच्या बैलगाडा शर्यतीपेक्षा अधिक चर्चा आहे, ती चिंचोशीच्या नाना उर्फ मधुकर पाचपुते यांच्या घोडे सवारीची. नव्हे, या शर्यतीत तेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. त्यांच्या या अदाकारीचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

काडं अन् जोकाड जुंपली त्याच्यांपुढे घोडेस्वार म्हणून होते मधुकर नाना पाचपुते. वय 75 वर्षे. नाद महाराष्ट्राच्या मातीतला, अंगावर शहारे आणणारा क्षण. शर्यतीला सुरूवात झाली अन् मधुकर पाचपुते यांची अदाकारी सुरू झाली. घोडेस्वारी करतांना नाना पाचपुते यांची ती अदाकरी, तो थाट, एखाद्या विशितल्या पोरालाही लाजवेल, असाच चित्तथरारक होता. नाना पाचपुते यांच्या घोडीस्वारीचा क्षण उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. त्यांच्या अदाकारीला उपस्थित बैलगाडा शौकिनांनी टाळ्या-शिट्या वाजवून दाद दिली.

लगाम न घालताही घोड्याला आवर, ही त्यांची खासियत -बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्याने पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू झाल्या आहेत. नुकतीच मावळातील नाणोलीच्या घाटात बैलगाडा शर्यत पार पडली. खेड तालुक्यातील चिंचोशी गावातील नाना पाचपुते (वय ७५) हे कळत्या वयापासूनच घोडेस्वारी करतात. आता ते सत्तरीत आहेत. घोडेस्वारीला सुरूवात करून त्यांना जवळपास ५० वर्षे झाली. बैलगाडीचा नाद अन् अंगात असलेला हौशीपणा यामुळे त्यांच्यात घोडेस्वारी मुरत गेली. पंचक्रोशीत कुठेही बैलगाडा शर्यत असली की तिथे मधुकर पाचपुते हजर असतात. लगाम न घालताही घोडीला आवरायचे कसब त्याच्यात असल्याने कितीही बेभान असलेली घोडी ते आवरतात.

यासंदर्भात बोलताना घोडेस्वार मधुकर (नाना) पाचपुते म्हणाले, १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर घोडा शर्यत सुरू झाली. शर्यत सुरू झाल्याने आनंदाला पारावर राहिला नाही. बैलगाडा शर्यत ही आमच्यासाठी जीव की प्राण. त्यामुळे घोडीवर बसून शर्यतीचे सारथ्य करणे हे जिकीरीचे असले तरीही त्यात मिळणाऱ्या आनंदाला सीमा नसते. परत शर्यती सुरू झाल्या अन आनंद व्दिगुणीत झाला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड