शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

दापोडी-निगडी 'बीआरटीएस' मार्गावर बस धावली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:26 IST

गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला होता.

ठळक मुद्दे बीआरटीएस मार्गावरील बंदी न्यायालयाने उठविल्यानंतर मार्गावर बस सुरुइतर वाहने या मार्गात शिरल्यास पोलिसांकडून दंडाची आकारणी केली जाणार

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावर आठ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी (दि. २४ आॅगस्ट) अखेर पीएमपीएमल बस धावली. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून निगडीतून बीआरटी मार्गावर बससेवा सुरु झाली. तसेच निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनलचे देखील उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे, सचिन चिखले, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएलच्या व्यस्थापकीय संचालिका व अध्यक्षा नयना गुंडे, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंबासे, उपअभियंता विजय भोजने,  दिपक पाटील, संजय काशिद, संजय साळी, बाळासाहेब शेटे उपसथित होते.गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला होता. सन २०१३ मध्ये बीआरटीएस मार्गावर सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या नसल्याचे कारण देत अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर पालिकेने सुरक्षिततेबाबत उपाययोजना करुन याचिकाकर्त्यांसोबत मार्गावर तीन वेळा बसची चाचणी घेतली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने बीआरटीएस बस सुरु करण्यास नुकताच हिरवा कंदील दर्शविला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या  बीआरटीएस मार्गावरील बंदी न्यायालयाने उठविल्यानंतर मार्गावर बस सुरु केली आहे. दोन महिन्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर करुन कायमस्वरुपी बस चालू करण्यात येणार आहे.या मार्गावरुन २७३ बस धावणार आहेत. एका दिवसाला २२०० ते २३०० फे-या होतील. एका मिनिटाला एक बस धावणार आहे. पुणे स्टेशन, मनपा भवन, हडपसर, शेवाळवाडी, वाघोली, कात्रज, अप्पर इंदिरानगर, कोथरुड डेपो, वारजे माळवाडी या मार्गावरील बस धावणार आहेत. पीएमपीच्या ११३ गाड्या, तर भाडेतत्त्वावरील १३९गाड्या या मार्गावर नव्याने आणल्या असून, अन्य बीआरटी मार्गावरील २१ गाड्या अशा एकूण २७३ गाड्या या मार्गावर धावतील. सध्या या मार्गावरून धावणा-या काही जुन्या गाड्या अन्य मार्गांवर पाठविल्या जातील. बीआरटीएस मागार्तून केवळ बीआरटीच्या बस, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या, मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला परवानी देण्यात आली असून इतर वाहनांना परवानगी नाही. इतर वाहने या मार्गात शिरल्यास पोलिसांकडून दंडाची आकारणी केली जाणार आहे. पालिकेने दंडाची रक्कम ठरवून दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलnigdiनिगडी