बाह्यवळणावर मोटार जळून खाक

By Admin | Updated: February 7, 2016 03:41 IST2016-02-07T03:41:03+5:302016-02-07T03:41:03+5:30

देहूरोड-कात्रज बायपासवर देहूरोड बाह्यवळण मार्गावर लोणावळ्याहून देहूरोडकडे येत असलेली मोटार अचानक पेट घेऊन खाक झाली. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडलेल्या

Burning on the exterior | बाह्यवळणावर मोटार जळून खाक

बाह्यवळणावर मोटार जळून खाक

देहूगाव : देहूरोड-कात्रज बायपासवर देहूरोड बाह्यवळण मार्गावर लोणावळ्याहून देहूरोडकडे येत असलेली मोटार अचानक पेट घेऊन खाक झाली. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडलेल्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या एका बंबाच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली. चालक निखिल अनिल खुणे (वय २३ , रा. विकासनगर, किवळे) याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. खुणे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो किवळे येथील राजेश शर्मा यांच्या मालकीची मोटार (एमएच ०१ एव्ही ९९५५) घेऊन लोणावळ्याहून विकासनगरला येत होता. पहाटे चारच्या सुमारास तो येथील शिंदे पेट्रोल पंपाजवळ पोहचला असताना, त्याला गाडीतून काही तरी जळाल्याचा वास येऊ लागला. संशय आल्याने चालक निखिल याने मोटार रस्त्याच्या कडेला घेतली. तो गाडीतून बाहेर येताच मोटारीच्या इंजिनच्या बाजूने वेगाने धूर निघू लागला होता. काय होते हे पाहत असतानाच मोटारीतून निघणाऱ्या धुराचे आगीत रूपांतर झाले. (वार्ताहर)

Web Title: Burning on the exterior