वाकड रस्त्यावर बर्निंग कारचा थरार ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 22:46 IST2017-07-21T22:46:03+5:302017-07-21T22:46:03+5:30

वाकड येथे रात्री साडेअकराची वेळ, धावती मोटार अचानक पेट घेते, क्षणार्धात आग रौद्र रूप धारण करते अन् मोटार खाक होते, असा बर्निंग कारचा थरार गुरुवारी रात्री वाकड येथे पहायला मिळाला.

Burning car thump on the Wakad road .... | वाकड रस्त्यावर बर्निंग कारचा थरार ....

वाकड रस्त्यावर बर्निंग कारचा थरार ....

ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 21 : वाकड येथे रात्री साडेअकराची वेळ, धावती मोटार अचानक पेट घेते, क्षणार्धात आग रौद्र रूप धारण करते अन् मोटार खाक होते, असा बर्निंग कारचा थरार गुरुवारी रात्री वाकड येथे पहायला मिळाला.
अनवर शेख हे पत्नी व मुलीसह (एमएच १२, एलपी ३४२७) या मोटारीतून वाकड रस्त्यावरून जात होते. रस्त्यावरून जात असतानाच धावत्या मोटारीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने मोटारीने अचानक पेट घेतला. सुरुवातीला किरकोळ असलेली आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. या आगीत काही वेळातच संपूर्ण मोटार जळून खाक झाली. दरम्यान, आग लागल्याचे समजताच मोटार थांबवून मोटारीतील सर्व जण बाहेर पडले. यामुळे सुदैवाने कोणालाही ईजा झाली नाही. काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान, ही ह्यबर्निंग कारह्ण पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती.

Web Title: Burning car thump on the Wakad road ....