बिल्डरला घातला अडीच कोटींना गंडा

By Admin | Updated: March 7, 2016 01:09 IST2016-03-07T01:09:37+5:302016-03-07T01:09:37+5:30

वाई तालुक्यातील मौजे शेंदुरजने येथील तब्बल २२५ एकर शेतजमिनीच्या व्यवहारात पाच जणांनी पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला २ कोटी ४७ लाख २५ हजार रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला

The builder got two and a half million dollars | बिल्डरला घातला अडीच कोटींना गंडा

बिल्डरला घातला अडीच कोटींना गंडा

पुणे : वाई तालुक्यातील मौजे शेंदुरजने येथील तब्बल २२५ एकर शेतजमिनीच्या व्यवहारात पाच जणांनी पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला २ कोटी ४७ लाख २५ हजार रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
चंद्रशेखर मधुकर चोरगे (उत्तेकर नगर, सातारा) असे अटक झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शंतनू शंकर देशपांडे (रा. दुर्ग अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंद्रशेखर चोरगे याच्यासह त्याची पत्नी ऊर्मिला चोरगे, प्रमोद लक्ष्मण शेटे (रा. सिद्धनाथवाडी, वाई), सुहास सदाशिव जाधव (रा. पांडे, ता. वाई) आणि रमेश सखाराम जाधव (रा. गुळूंब, ता. वाई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरगे याला अटक करून पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. चोरगे याचे राहणीमान ऐशोआरामाचे असून, महागड्या गाड्या; तसेच विदेशात फिरायला जाणे,
अशा विविध मार्गाने पैसे खर्च करीत. तो शेतकऱ्यांची व इतर व्यावसायिकांची फसवणूक करून पैसे कमवित असे, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
यासह गुन्ह्यातील विविध बाबींचा तपास करण्यासाठी
सरकारी वकील रजनी तहसीलदार यांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: The builder got two and a half million dollars