स्थायीपुढे सादर होणार अंदाजपत्रक

By Admin | Updated: February 10, 2016 03:26 IST2016-02-10T03:26:08+5:302016-02-10T03:26:08+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंगळवारी महापालिका आयुक्त स्थायी समितीपुढे सादर करणार आहेत.

Budget to be submitted to the Standing Committee | स्थायीपुढे सादर होणार अंदाजपत्रक

स्थायीपुढे सादर होणार अंदाजपत्रक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंगळवारी महापालिका आयुक्त स्थायी समितीपुढे सादर करणार आहेत.
मागील २०१५-१६ या आर्थिक वर्षात महापालिकेचे २३०० कोटींचे अंदाजपत्रक होते. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा निधी, अनुदान मिळून हे अंदाजपत्रक ३ हजार ६०० कोटींपर्यंत पोहोचले. मात्र, यंदाचे अंदाजपत्रक किती असेल, कोणत्या कामांना प्राधान्य देण्यात आले असेल, याबाबत उत्सुकता आहे. त्यातच महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने लोकप्रतिनिधींना या अंदाजपत्रकांतून अधिक अपेक्षा असतील. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना अधिक तरतूद करावी, अशी तेथील लोकप्रतिनिधींसह नागरिकांची मागणी आहे. अंदाजपत्रकात या गावांसाठी किती तरतूद केली जाणार, याबाबत उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)

संगणक खरेदी
विविध विभागांसाठी ७० संगणक खरेदी करणार आहे. यासाठी येणाऱ्या २५ लाखांच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. हे संगणक संच खरेदी करण्यासाठी आॅनलाइन निविदा मागविण्यात आल्या होत्या.

Web Title: Budget to be submitted to the Standing Committee