शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Budget 2019: शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 2:12 AM

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करणार, दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र शेती जोडधंदा, खत व हमीभाव यावर काहीच नियोजन नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी घोषणांचा वर्षाव अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करणार, दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र शेती जोडधंदा, खत व हमीभाव यावर काहीच नियोजन नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांच्या दृष्टीने निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे. कारण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याचे यामध्ये सांगितले आहे. मात्र संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दरमहा सहाशे रुपये दिले जातात. आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कुटुंबाला दरमहा पाचशे रुपये दिले जाणार. याचा अर्थ ही शेतकऱ्यांची थेट फसवणूक आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामधूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केलेला हा अर्थसंकल्प आहे.- हरिश मोरे, कार्याध्यक्ष,शेतकरी कामगार संघटनाअर्थसंकल्पातील किसान सन्मान निधीचाही शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल, पण महागाईचा जमान्यात हेक्टरी सहा हजार म्हणजे तुंटपुंजी मदत आहे ती वाढवायला हवी, पशुधन व मस्त्यव्यवसायासाठी शेतकरी घेत असलेल्या कर्जावर दोन टक्के सवलत शेतकऱ्यांना आधार देण्यासारखी आहे, यामुळे तरूण शेतीकडे वळण्याबरोबर जोड धंदा म्हणून हा व्यवसाय करण्याचा विचार करू शकतात. - सुनिल गरुड, शेतकरीशेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी योजनांची घोषणा केली असली तरी सरकारने शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये देऊ केलेली रक्कम अतिशय तुटपुंजी आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी वर्गाला आकर्षित करण्याचा हा प्रयत्न केला आहे. देऊ केलेली रक्कम गरजू व्यक्तीपर्यंत पोहचणे म्हत्त्वाचे आहे.- संतोष आरोटे, शेतकरीअसंघटीत कामागारांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. पेन्शनचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या योजनेमुळे असंघटित कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र संघटित कामगारांचा या वेळीही काहीच विचार केला गेला नाही. कंत्राटी कामगार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यांना पर्मन्ट कसे करता येईल यावर काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एकूणच कामगारांसाठी संमिश्र असा संकल्प आहे. - यशवंत भोसले, अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडीहा अर्थसंकल्प कामगार वर्गाचे हित जपणारा असून विशेषत: असंघटीत कामगारांना या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळालेला आहे. आता कामगारांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याने त्यांचे जीवनमान सुखकर होण्यास मदत होणार आहे.- संजय चव्हाण, नोकरदारपेन्शनधारकांसाठी हा अर्थसंकल्प खूप चांगला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बचत होण्यासाठी मदत होईल. त्याचा फायदा नक्कीच सर्व पेन्शनधारकांना होईल.- गायत्री येवलेकर, नोकरदारज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजातून मिळणाºया चाळीस हजार रुपयांच्या उत्पन्नासाठी टीडीएस भरावा लागणार नाही, ही योजना स्वागतार्ह आहे. ज्येष्ठांचा विचार करून घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा अर्थसंकल्प फायद्याचा आहे.- सूर्यकांत पारखी, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघटना, चिंचवड

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Farmerशेतकरी