बीआरटी मार्गाचे होतेय विद्रूपीकरण
By Admin | Updated: November 16, 2016 02:35 IST2016-11-16T02:35:58+5:302016-11-16T02:35:58+5:30
बंद बीआरटी मार्गाचा उपयोग वाहनांची पार्किंगसाठी होत असताना, येथील थांब्याचा उपयोग जाहिरातीचे फलक लावण्यासाठीदेखील होत

बीआरटी मार्गाचे होतेय विद्रूपीकरण
पिंपरी : बंद बीआरटी मार्गाचा उपयोग वाहनांची पार्किंगसाठी होत असताना, येथील थांब्याचा उपयोग जाहिरातीचे फलक लावण्यासाठीदेखील होत आहे. ठिकठिकाणच्या थांब्यांवर वाढदिवस, व्यवसाय व इतर जाहिरातीचे फलक मोठ्या प्रमाणात लावल्याने थांब्याचे विद्रूपीकरण होत आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित व गतिमान करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने गेल्या वर्षापासून काही मार्गांवर बीआरटी सेवा सुरू केली आहे. मात्र, काही मार्गावर काम पूर्ण होऊनही अद्याप सेवा सुरू झालेली नाही.
सेवा सुरू न झाल्यामुळे या मार्गांचा उपयोग परिसरातील नागरिक मोटार गाड्यांच्या पार्किंगसाठी करत आहेत. तर काही नागरिक मार्गावरील थांब्यांचा उपयोग जाहिरातीचे फलक लावण्यासाठीदेखील करत आहेत. काळेवाडी फाटा ते पिंपरी या मार्गावरील बस थांब्यावर चारही बाजूला वाढदिवस, कार्यक्रम, कोचिंग क्लासेस व इतर व्यावसायिक जाहिरातीचे फलक लागले आहेत. विशेष म्हणजे काही फलक तीन ते चार महिन्यांपासून लागले आहेत. दिसेल त्या ठिकाणी लहान-मोठे जाहिरातीचे फलक लागल्यामुळे थांब्याचे विद्रुपीकरण झाले आहे.
काही नागरिकांनी या मार्गावरील दोन्ही बाजूला बसविण्यात आलेल्या लोखंडी दुभाजकावरदेखील लहान आकाराच्या जाहिराती चिकटवल्या आहेत. शहरात कोणत्याही ठिकाणी वाढदिवस, व्यावसायिक फलक लावण्यापूर्वी महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)