शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

शालेय साहित्य खरेदीस ब्रेक ; प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 20:51 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण समितीत साहित्य खरेदीचे प्रकरण गाजत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे खासगी संस्थेतर्फे देण्यात येणार उपक्रमशील बारा शाळेतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी केले जाणार

पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण समितीने स्थायी समितीपुढे सहा प्रस्ताव सादर केले होते. मात्र, या प्रस्तावात कोणती साहित्य खरेदी, प्रमाण किती खर्च किती याची माहिती नसल्याने स्थायी समितीने खरेदीला ब्रेक लावला आहे. आर्थिक तरतूद मान्यतेसह साहित्य खरेदीचे प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले आहेत. अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण समितीत साहित्य खरेदीचे प्रकरण गाजत असतानाच शिक्षण समिती सदस्यांनी स्थायी समितीपुढे साहित्य खरेदीचे सहा विषय सादर केले होते. त्याविषयात कोणतीही सुस्पष्टता नव्हती. किती विद्यार्थ्यांना लाभ होणार आणि खर्च किती येणार याबाबत माहिती नव्हती त्यामुळे  या विषयांवर मडिगेरी यांनी प्रशासनास माहिती विचारली.

अशी होणार खरेदीपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड गणवेश खरेदी करणे. विद्यार्थ्यांचा पेहराव आकर्षक करण्यासाठी सन २०१९-२० या शैक्षणिक वषार्पासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हाफ जॅकेट खरेदी करणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्य हितासाठी सर्व विद्यार्थ्यांना पाणी पिण्याकरीता कॉपर (तांबे) बाटली खरेदी करूत त्याचे वितरण करणे. उपक्रमशील बारा शाळेतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मध्यान भोजनासोबत पौष्टिक आहार म्हणून अंडी आणि सफरचंद, डाळींब, केळी असे फळ देण्यात येणार आहे. मेंदू तलख व्हावा, म्हणून विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे खासगी संस्थेतर्फे देण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दरवर्षी पाचशे रुपये खर्च असून, पुस्तक व साउंट ट्रॅक संचाची किंमत तीनशे रुपये आहे. शाळांमधील ग्रंथालयासाठी थेट पद्धतीने दोन लाखांची पुस्तके खरेदी केले जाणार आहेत. सर्व प्राथमिक शाळेत डिजिटल क्लास रूम सुरू केले जाणार आहेत.  शिक्षण समितीचे सदस्य प्रस्ताव स्थायी समोर आले होते.विलास मडिगेरी म्हणाले, शिक्षण समितीचे सर्व प्रस्ताव सदस्य प्रस्ताव असून, त्यात सविस्तर माहिती नाही. निविदा प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून सविस्तर माहितीसह प्रस्ताव सादर करण्याचा सूचना केली.ह्णह्णनुसताच खरेदीचा सपाटासर्वसाधारण सभेत शिक्षण समितीच्या खरेदीवर टीका केली. शिक्षणाचा दर्जा घसरल्याने विद्यार्थी संख्या घटून अनेक शाळा बंद पडल्या आहेत. शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारणापेक्षा शिक्षण समिती व शिक्षण विभागाला  साहित्य व सुविधा खरेदीमध्ये अधिक रस असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यावर  सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला होता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थी