शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 21:12 IST

सायकल घेऊन बाहेर खेळण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दापाेडी येथे घडली आहे.

पिंपरी : शाळेतून घरी आल्यानंतर सायकल घेऊन बाहेर खेळण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. दापोडी येथे सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) येथे गुरुवारी (दि. ४) ही घटना घडली. श्रीरंग किरण जोशी असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. तो इयत्ता तिसरीत शिकत होता. 

याबाबत माहिती अशी, श्रीरंग याची आई कोमल जोशी सीएमई येथील एका सैनिकी अधिकाऱ्याच्या बंगल्यावर कामाला आहे. त्यामुळे सीएमईमध्ये मधील वसाहतीत जोशी कुटुंब वास्तव्यास आहे. श्रीरंग याचे वडील किरण राजकुमार जोशी एका खासगी कंपनीत वाहनचालक आहेत. जोशी कुटुंबीय मुळचे तेलंगणा राज्यातील अदिलाबाद येथील आहेत.   श्रीरंग गुरुवारी दुपारी साडेबाराला शाळेतून घरी आला. त्यानंतर खेळण्यासाठी सायकल घेऊन बाहेर गेला. बराच वेळ परतला नाही म्हणून त्याची शोधाशोध सुरू झाली. त्याची आई कोमल व आजी आदींनी श्रीरंग याचा शोध सुरू केला. तेथेच एक सहा ते सात फूट खोल खड्डा असून त्या खड्ड्याजवळ श्रीरंग याची सायकल दिसून आली. त्यामुळे कोमल जोशी यांनी खड्ड्याजवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी श्रीरंग खड्ड्यातील पाण्यात पडला असल्याचे त्यांना दिसून आला. खड्ड्यातून काढून श्रीरंग याला तेथील एका रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्याला हलविण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात