मारहाणप्रकरणी दोघांना अटक
By Admin | Updated: March 18, 2017 04:45 IST2017-03-18T04:45:30+5:302017-03-18T04:45:30+5:30
दोघांना मारहाण करीत दरवाजा, खिडकी व मोटारीचे नुकसान केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पंचतारानगर, आकुर्डी येथे घडली.

मारहाणप्रकरणी दोघांना अटक
पिंपरी : दोघांना मारहाण करीत दरवाजा, खिडकी व मोटारीचे नुकसान केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पंचतारानगर, आकुर्डी येथे घडली.
तेजस राजू तापकीर (वय २०), आदर्श कडवली (वय १८, दोघेही रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बशीर हवालदार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बशीर हे त्यांच्या घरी कपड्यांना इस्त्री करीत असताना आरोपींनी बेकायदारीत्या जमाव जमवून बशीर व त्यांचे मेहुणे यांना शिवीगाळ करीत सिमेंट ब्लॉकने मारहाण केली. तसेच हवालदार यांच्या घराचा दरवाजा, खिडकीचे, तसेच गाडीचे लाकडी दांडक्याने नुकसान केले. (प्रतिनिधी)