शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकाजवळ सापडले बॉम्ब शिल्ड आणि खळबळ उडाली; पिंपरीतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:22 IST

बॉम्ब शोधक नाशक पथकाने बॉम्ब शेलची पाहणी करून ते ताब्यात घेतले आहेत. 

पिंपरी : भारत-पाकिस्तान मध्ये युद्धाचा तणाव वाढत आहे, अशातच पिंपरीतील रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी जुने दोन बॉम्ब शेल आढळून आले. पोलिसांची तारांबळ उडाली. बॉम्ब शोधक नाशक पथक दाखल झाले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.   पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भंगारच्या दुकानाजवळ शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास जुने बॉम्ब शेल आढळून आल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस, बॉम्ब शोधक नाशक पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ धाव घेतली व बॉम्ब शोधक नाशक पथकाने बॉम्ब शेलची पाहणी करून ते ताब्यात घेतले आहेत.  बॉम्बशेल तपासणीसाठी संरक्षण विभागाकडेपोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. मात्र आणखी बॉम्ब शेल अथवा इतर संशयित वस्तू आढळून आल्या नाहीत. आढळलेले बॉम्ब शेल पुढील तपासणीसाठी संरक्षण विभागाकडे दिले जाणार आहे. हे पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात सातत्याने अशा प्रकारचे बॉम्ब शेल आढळून येतात. शुक्रवारी आढळलेले बॉम्ब शेल भांगरमध्ये चोरट्या पद्धतीने आणले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.  सोशल मीडियावर चर्चा सध्या भारत-पाकिस्तान युद्धाचा तणाव वाढत आहे. देशभर सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी उपायोजना केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी पिंपरी येथे युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रील घेण्यात आले. हे मॉकड्रील यशस्वी झाल्यानंतर सर्व यंत्रणा युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात हे बॉम्ब शेल आढळल्याने आज दुपारी खळबळ उडाली. सोशल मीडियावर छायाचित्र फिरत होती. मात्र, कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPakistanपाकिस्तान