शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

बोगस अधिकारी खडकीमध्ये जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 3:13 AM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधिकारी असल्याची बतावणी करुन नागरिकांची फसवणूक करणाºया एका महिलेसह दोघांना खडकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पिंपरी -  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधिकारी असल्याची बतावणी करुन नागरिकांची फसवणूक करणाºया एका महिलेसह दोघांना खडकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मर्सी जोएल फर्नांडिस (वय ३६, रा. सत्यरिव्हर अपार्टमेंट) व सतीश रमेश जाधव (वय ३७, रा. शिवरामनगर, गल्ली क्रमांक १, पिंपळे गुरव) अशी त्यांची नावे आहेत. यातील तक्रारदार यांना ३ जानेवारीला फर्नांडिस यांनी फोन करून आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्याकडे एका व्यक्तीची माहिती विचारली. ही माहिती व कागदपत्रे दिल्यास त्या व्यक्तीकडून मोठी रक्कम घेऊ व त्यातील काही रक्कम तुम्हाला देऊ, असे तक्रारदार यांना सांगण्यात आले. ५ जानेवारीला प्रत्यक्ष भेटून चर्चा करू व पुढील धोरण ठरवू असे कळविल्यानंतर तक्रारदार यांनी फर्नांडिस यांना नाव विचारले. नाव समजल्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयाशी संपर्क साधला व त्यांना आलेल्या फोनबाबतची कल्पना दिली. तसेच तक्रारदार यांनी फर्नांडिस यांच्याबाबत तक्रार दिली.खडकी पोलिसांनी फर्नांडिस या महिलेला पकडण्यासाठी बोपोडी येथील सह्याद्री रुग्णालय येथे सापळा रचला. तक्रारदार, फर्नांडिस व त्यांच्यासोबत असलेल्या जाधव या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट झाली. त्या वेळी तक्रारदाराने त्यांच्या ओळखपत्राबाबत विचारणा केली असता त्यांनी ‘अ‍ॅन्टिकरप्शन इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ लिहिलेले ओळखपत्र दाखविले. त्याच वेळी खडकी पोलिसांनी फर्नांडिस आणि जाधवला ताब्यात घेतले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या