नेहरुनगरमध्ये नाकाबंदी

By Admin | Updated: January 26, 2017 00:30 IST2017-01-26T00:30:55+5:302017-01-26T00:30:55+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांच्या वतीने मासूळकर कॉलनी परिसरात नाकाबंदी

Blockade in Nehrunagar | नेहरुनगरमध्ये नाकाबंदी

नेहरुनगरमध्ये नाकाबंदी

नेहरूनगर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांच्या वतीने मासूळकर कॉलनी परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून संत तुकारामनगर पोलीस चौकीच्या हद्दीतील मासूळकर कॉलनी येथील रसरंग चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी नाकाबंदी करून रसरंग चौकात मोरवाडी, अजमेरा, मासूळकर कॉलनी परिसरातून नेहरूनगर, संत तुकारामनगरकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेड्स लावून संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे यांच्यासह पोलीस नाईक संदीप मांडवी, के. आर. वावळ यांचा बंदोबस्त होता. पोलिसांनी २३ वाहनांची कागदपत्रे, परवाना आदींची तपासणी केली. तीन वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. (वार्ताहर)

Web Title: Blockade in Nehrunagar