शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

कोविड सेंटरमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपा महिला मोर्चातर्फे पिंपरीत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 14:03 IST

कोविड सेंटरमधील महिला रुग्णांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने भाजपा महिला मोर्चातर्फे मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन केले...

ठळक मुद्देठिकठिकाणी पोलीस प्रशासनाला प्रमुख मागण्यांचे दिले निवेदन

पिंपरी : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील महिला वॉर्डमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमावा यासह प्रमुख मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले. यावर तात्काळ कार्यवाही झाल्यास अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी व्यक्त केला.

कोविड सेंटरमधील महिला रुग्णांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने भाजपा महिला मोर्चातर्फे मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन केले. ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाला प्रमुख मागण्यांचे निवेदनही दिले. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना निवेदन दिले. यावेळी प्रदेश पदाधिकारी शैला मोळक, शहराच्या अध्यक्षा उज्वला गावडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारती विनोदे, कोमल काळभोर, जिल्हा सरचिटणीस दिपाली धनोकार, सुप्रिया पाटील, शहर महिला सरचिटणीस सोनम मोरे, दीपाली धनोकार शहर उपाध्यक्ष रंजना चिचवड़े, सोनम जांभुळकर आदी उपस्थित होते.         प्रदेशाध्यक्षा खापरे म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात महिला आघाडीच्या वतीने आंदोलन केले. सर्व महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. त्याद्वारे कोविड सेंटरमधील महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे सुरक्षा मिळावी. यासाठी प्रामुख्याने महिला सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे. कोविड सेंटरच्या बाहेर रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असावी. पोलिसांकडे पीपीई किट असावे. कदाचित काही घटना घडली तर पोलिस यंत्रणा तिथे ताबडतोब पोहोचली पाहिजे. ज्या रूममध्ये महिला  अ‍ॅडमिट आहे तिथे बेलची व्यवस्था केलेली असावी, आदी मागण्या केल्या.’’

पोलीस आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद...एखाद्या फेस्टिवलसाठी पोलीस यंत्रणा आणि महानगरपालिका  एकत्रित काम करत असतात तसेच काम कोविड सेंटरच्या संदर्भात सुद्धा करावे, अशी मागणी महिला मोर्चाच्या वतीने केली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संबंधित मागणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच, महापालिका आयुक्तांना फोन करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाWomenमहिलाcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस