शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली; सर्वसाधारण सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 02:58 IST

शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ प्रशासन दखल घेत नाही. याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात भटकी कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला.

पिंपरी : शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ प्रशासन दखल घेत नाही. याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात भटकी कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. लहान कुत्र्यांची पिले सोडण्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये वाद सुरू झाल्याने सभा तहकूब करण्यात आली.महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. नागरिक आणि नगरसेवकांच्या तक्रारींची दखल प्रशासन घेत नाही, याचा निषेध करण्यासाठी राष्टÑवादीचे विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी आपली पाळीव कुत्र्यांची पिले महापालिकेत आणली होती. ही बाब भाजपाच्या लक्षात आली. तसेच पिले सभागृहात घेऊन जाण्यास सुरक्षारक्षकांनी मज्जाव केला. लहान पिलांवर अन्याय होत आहे, हा मुद्दा सभागृहात भाजपा नगरसेवकांनी लावून धरला.स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या, ‘‘आंदोलन करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, लहान पिल्लांना पिशवीत आणले. गुदमरून काही घडले तर त्याला जबाबदार कोण? हा प्रकार करणाºयांवर प्राणिमित्र कायद्यान्वये (पेटा) गुन्हा दाखल करायला हवा.’’ त्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले,‘‘भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. अधिकारी फोन उचलत नसतील तर गंभीर बाब आहे. सभागृहात कुत्रे आणण्यापर्यंतची वेळ का आली याचाही विचार करावा.’’भाजपाच्या आशा शेंडगे म्हणाल्या,‘‘विरोधी पक्षनेत्याने त्यांचे काम करावे. परंतु, मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये. मुक्या जनावरांवर अत्याचार होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. कारवाई करायलाच हवी.’’ विकास डोळस म्हणाले, ‘‘विरोधकांनी प्रशासनावर राग काढायला हवा होता. मुक्या जनावरांवर अन्याय करू नये.’’राष्ट्रवादीच्या विनया तापकीर म्हणाल्या, ‘‘एकीकडे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा बाता मारायच्या आणि दुसरीकडे हे शहर कुत्र्यांचे शहर बनवायचे हे चुकीचे आहे. आंदोलन केले नाही, तर प्रश्न सुटणार कसे.’’नीता पाडाळे म्हणाल्या, ‘‘कुत्री, डुकरांचा सुळसुळाट आहे. नागरिकांच्या घरात डुकरे शिरतात तरीदेखील त्यांचा बंदोबस्त केलाजात नाही. ’’श्रद्धांजली वाहून सभा तहकूबया दरम्यान राष्ट्रवादी नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. महापौर राहुल जाधव यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना केली. नगरसेवक नामदेव ढाके यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना मांडली. त्यानंतर श्रद्धांजली वाहून सभा दहा मिनिटे तहकूब करण्यात आली. सभा सुरू होताच सभागृहनेते एकनाथ पवार यांनी ९६ कुळी शेतकरी शब्द सभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची सूचना करत सभा २७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला शत्रुघ्न काटे यांनी अनुमोदन दिले.अधिकाºयांवर गुन्हे दाखल कराशिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले,‘‘शहरात मोकाट कुत्री, डुकरांचा त्रास होत आहे. आंदोलनाची वेळ का येते, या मुद्यापासून दूर जाऊ नये, आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची पद्धत चुकीची आहे. पिल्ले आणली म्हणून गुन्हे दाखल करणार असाल तर स्वाईन फ्लू, डेंगी, मलेरीयाने अनेक लोक दगावले. मोकाट कुत्र्यांमुळे अनेक जण जखमी झाले. यास कारणीभूत असणाºया अधिकाºयांवरही गुन्हे दाखल करायला हवेत.’’विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, महापौर, सभागृह नेत्यांच्या विनंतीनुसार आम्ही कुत्र्यांची पिल्ले सभागृहात आणली नाहीत. पिल्ले आणणाºयांवर गुन्हा दाखल करा असे म्हणणे गैर आहे. या वेळी सीमा सावळे आणि साने यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. मी ९६ कुळी शेतकरी, या विरोधी पक्षनेत्यांच्या शब्दावरून सावळे आक्रमक झाल्या.भाजपाचे संदीप वाघेरे म्हणाले,‘‘शहर प्राणि संग्राहालय झाले आहे. डुकरे, कुत्री, भाकड जनावरांचा सुळसुळाट आहे. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.’’ नामदेव ढाके व उषा मुंडे यांनीही आंदोलनाचा निषेध केला.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड