शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

पिंपरी-चिंचवडमधील भाजपा नगरसेवक आपल्याच पक्षावर नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 3:39 PM

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मधील दिघी परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मधील दिघी परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. त्याच्या कामालाही सुरूवात केली आहे. मात्र प्रभागातील बोपखेल गावाला वगळले आहे, या गावाला कायम दुय्यम दजार्ची वागणूक मिळाली असून, आताही चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतून गावाला वगळले आहे. या योजनेत बोपखेलचाही समावेश करावा, अशी मागणी  भाजपच्या नगरसेवकांनी  आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. सत्ताधा-यांच्या विरोधात भाजपा नगरसेवकांनी मागणी केली आहे. प्रशासनाचा निषेध केला आहे.प्रभागातील भाजपच्या नगरसेविका हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, नगरसेवक लक्ष्मण उंडे, विकास डोळस यांनी आयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, ‘‘प्रभाग क्रमांक ४, दिघी आणि बोपखेल हा परिसर नेहमी विकासापासून वंचित राहिला आहे. या भागातील पाणी समस्या ही नित्याचीच बाब बनली आहे. त्यावर कायमचा तोडगा काढण्याच्यादृष्टीने महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रभागातील दिघी भागात चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. त्याच्या कामालाही सुरूवात झाली आहे.  या प्रभागातील बोपखेल भागाचा चोवीस तास पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यात आलेला नाही.

सवतासुभा का? दिघी आणि बोपखेल हा एकच प्रभाग आहे. असे असताना या प्रभागातील केवळ एकाच भागात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची योजना राबवणे संयुक्तिक होणार नाही. बोपखेल गाव महापालिकेत समावेश झाल्यापासून विकासाच्या बाबतीत नेहमीच वंचित राहिला आहे. या गावाला कायम दुय्यम दजार्ची वागणूक दिली आहे. गावात अजूनही मुलभूत सोयी सुविधा पूर्ण क्षमतेने पुरवण्यात आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत एकाच प्रभागातील दिघी भागाला चोवीस तास पाणीपुरवठा झाल्यास बोपखेल गावातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार आहे. येथील नागरिकांमध्ये महापालिका प्रशासन बोपखेल गावांबाबत दुजाभाव करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने चोवीस तास पाणीपुरवठा योजनेत बोपखेल गावाचा देखील समावेश करावा. त्याबाबत संबंधित अधिका-यांना आदेश द्यावेत, अशी मागणी  नगरसेवकांनी केली आहे.