शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांचा जात दाखला अवैध,  नगरसेवकपद रद्द होणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 10:50 PM

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवगार्तून निवडून आलेले भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांचा जात दावा अवैध असल्याचा निर्णय बुलढाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. गायकवाड यांनी खोटी, बनावट कागदपत्रे सादर करुन सरकारची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.  

पिंपरी,  दि. 22 - पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवगार्तून निवडून आलेले भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांचा जात दावा अवैध असल्याचा निर्णय बुलढाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. गायकवाड यांनी खोटी, बनावट कागदपत्रे सादर करुन सरकारची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.   

     पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये झाली. या निवडणुकीत गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक मधून भाजपच्या उमेदवारीवर  निवडणूक लढविली होती. तसेच विजयीही झाले होते. गायकवाड यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करत अनुसूचित जाती प्रवगार्तून निवडणूक लढविली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी गायकवाड यांच्या जातदाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणीवर हरकत घेतली होती.  त्यावर बुलढाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. दरम्यान प्रमाण पत्र सादर करण्याची मुदत २२ आॅगस्टला संपणार असल्याने गायकवाड यांनी उच्च न्यायालयाकडून एक सप्टेंबरपर्यंत स्थगिती आदेश मिळविला होता. त्यामुळे काही दिवसांचा दिलासा मिळाला होता.

गायकवाड यांचा दावा फेटाळला

बुलढाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी टी.एम.बागुल, उपायुक्त तथा सदस्य व्ही.एस.शिंदे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव एम.जी.बाठ यांच्या समितीने सर्व कागदपत्रांची पाहणी करुन, दक्षता पथकाचा अहवाल विचारात घेऊन गायकवाड यांचा अनुसूचित जातीचा दावा फेटाळून लावला. ते कैकाडी जातीचे असून सोलापूर जिल्ह्यातील आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे. सोलापूर जिल्ह्यात कैकाडी समाज विमुक्त जात प्रवर्गात मोडतो. त्यामुळे गायकवाड यांचा अनुसूचित जातीचा दावा रद्द करण्यात येत असल्याचे बुलढाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निकाल पत्रात म्हटले आहे.

गुन्हा दाखल होणार 

गायकवाड राखीव प्रवगार्तून मिळणारे फायदे तात्काळ रद्द करावेत. खोटी, बनावट कागदपत्रे सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दक्षता पथकाच्या पोलिस निरीक्षकाने कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.  त्यामुळे नगरसेवक पद रद्द होण्याबरोबरच त्यांच्यावर गुन्हाही दाखल होणार आहे.