शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवड विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी भरला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:05 IST

भाजपच्या वतीने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली.

पिंपरी : चिंचवड विधानसभा परिसरातून रॅली काढून भारतीय जनता पक्षाच्या वतीने अश्विनी जगताप यांनी आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार बंधू शंकर जगताप यांनीही डमी अर्ज दाखल केलेला आहे.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सात फेब्रुवारी आहे. तर मतदानाची तारीख २६ फेब्रुवारी आहे.

शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढण्यात आली होती. चिंचवड विधानसभा परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. थेरगाव येथील महापालिकेच्या प्रभाग कार्यालयामध्ये चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुरू केले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये दुपारी साडेबाराच्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आदी उपस्थित होते. अश्विनी जगताप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे अर्ज सादर केला.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकBJPभाजपाLakshman Jagtapलक्ष्मण जगतापPoliticsराजकारण