शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेत नगरसेवक फोडाफोडीवरून भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 13:20 IST

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पन्नास नगरसेवकांनी आघाडीचे काम केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

ठळक मुद्देमहाशिवआघाडीचे सरकार राज्यात येण्याच्या हालचाली सुरू

पिंपरी : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पन्नास नगरसेवकांनी आघाडीचे काम केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. या फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपा आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. परंतु, नगरसेवकच काय, आमचा स्वीकृत सदस्यही  फुटणार नसल्याचा दावा, भाजपाने केला आहे.महाशिवआघाडीचे सरकार राज्यात येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेवर परिणाम होऊ नये, याची दक्षता भाजपाकडून घेतली जात आहे. ‘‘भाजपाच्या सुमारे ५० नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व पुरस्कृत अपक्ष उमेदवारांचे पडद्याआडून काम केले. राज्यात भाजपाची सत्ता गेल्याने मूळ राष्ट्रवादीतून गेलेल्या नगरसेवकांकडून महापौर निवडणुकीत फुटाफूटीची शक्यता आहे, असा दावा प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत केला............राज्यातील भाजपाची सत्ता गेली आहे. आता महापालिकाही हातातून जाईल, या भीतीने दोन्ही आमदारांना पछाडले आहे. त्या निवडणुकीस मूळचे राष्ट्रवादीचे असलेले मात्र, सध्या भाजपामध्ये गेलेल्या नगरसेवकांकडून दगाफटका होण्याची शक्यता त्यांना सतावत आहे. विधानसभेला भाजपाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मदत केल्याने आमचे मताधिक्य वाढले. राज्यात भाजपाची सत्ता आली असती तर, मताधिक्य घटल्याच्या कारणाने या दोन्ही आमदारांनी प्रत्येक नगरसेवकांची खरडपट्टी काढून अपमानित करण्याचे सत्र सुरू केले असते. मात्र, आता गोंजारण्याचे काम सुरू आहे.    - प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी .......पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे पन्नास नगरसेवक फुटून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील, असे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांना पडू लागले आहे. भाजपाचे नगरसेवक फोडण्याचा त्यांचा हा दावा हास्यास्पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपाचा एक मंडलाध्यक्षही फुटणार नाही. - तुषार कामठे, नगरसेवक, भाजपा. 

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस