शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत अतिक्रमणांवर ‘हातोडा’ : अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 18:14 IST

कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण काढण्यात आली.आजपर्यंतची भोसरीतील शुक्रवारी करण्यात आलेली कारवाई सर्वात मोठी असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचा धाडसी निर्णय नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण राजकीय वरदहस्तातून भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांचे अतिक्रमणमुख्य रस्त्यावर व्यवसाय करत असल्याने मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकची समस्या निर्माण आयुक्तांनी कारवाईचे धाडस केल्याने कारवाईला महत्त्व प्राप्त महापालिकेने अनेक तक्रारीवरून कारवाई करण्याचा घेतला निर्णय या भागात १०० हून अधिक छोटी-मोठी दुकाने

भोसरीभोसरीमधील कै.अंकुशराव लांडगे सभागृह परिसर आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली असलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी (दि. २६ आॅक्टो) ही कारवाई केली. या अनधिकृत पथारी अनधिकृत टपरी वाल्यांवर मोठा राजकीय वरदहस्त असल्याने खरंच कारवाई होणार का याकडे अख्ख्या शहराचे लक्ष लागले होते. कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण काढण्यात आली.आजपर्यंतची भोसरीतील शुक्रवारी करण्यात आलेली कारवाई सर्वात मोठी असल्याचे बोलले जात आहे.    राजकीय वरदहस्तातून भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांचे अतिक्रमण झाले होते. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाचा परिसर आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील परिसर अक्षरश: गिळंकृत करण्यात आला होता. त्यामुळे शंभर कोटी खर्चून हा पूल उभारल्यानंतरही वाहतुकीची समस्या कायम आहे. भोसरीतील आजी-माजी आमदारांची मेहेरनगर असल्याने महापालिका कारवाईला धजावत नाही असा आरोप हि अनेक जण करत होते.  महापालिकाच अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप होत होता. अखेर महापालिकेने अनेक तक्रारीवरून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि भोसरीत कारवाई झाली. कारवाईची संवेदनशीलता लक्षात घेता महापालिकेने पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडून मोठा पोलीस बंदोबस्त मागितला होता. शुक्रवारी दुपार पासून  ही कारवाई सुरू करण्यात आली होती. या भागात १०० हून अधिक छोटी-मोठी दुकाने होती. टपऱ्या, हातगाड्या असून, गेल्या काही दिवसात येथे अनधिकृत भाजी मंडई सुरू करण्यात आली होती. यासाठी ओटे देखील बांधून देण्यात आले होते. मंडई व्यतिरिक्त शॉपिंग बाजारच्या नावाखाली भोसरीतील गायरानाच्या मोकळ्या जागेत कपड्यांची दुकाने पत्राच्या शेडची बांधकामे करून थाटण्यात आली होती. हे अनधिकृत व्यापारी अगदी मुख्य रस्त्यावर व्यवसाय करत असल्याने मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली होती. याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नव्हती. मात्र, आता आयुक्तांनी कारवाईचे धाडस केल्याने कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

टॅग्स :bhosariभोसरीPoliceपोलिसEnchroachmentअतिक्रमण