भोसरीत तरुणाचा खून, दोन संशयित ताब्यात

By Admin | Updated: April 25, 2017 04:04 IST2017-04-25T04:04:20+5:302017-04-25T04:04:20+5:30

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या पुढे काही अंतरावर असलेल्या झोपडीतील एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला

Bhosari youth murder, two suspects arrested | भोसरीत तरुणाचा खून, दोन संशयित ताब्यात

भोसरीत तरुणाचा खून, दोन संशयित ताब्यात

पिंपरी : भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या पुढे काही अंतरावर असलेल्या झोपडीतील एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली आहे; परंतु खून झालेली व्यक्ती कोण? आणि खून करणारे आरोपी कोण? याबद्दल पोलिसांना ठोस असे काहीच हाती लागले नाही. सायंकाळी उशिरा भोसरी पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
भोसरीत लांडगे नाट्यगृहाच्या पुढे काही अंतरावर पत्र्याच्या झोपड्यांपासून काही अंतरावर एक मृतदेह दिसून आल्याने बघ्यांची गर्दी जमली. सकाळी ही माहिती पोलिसांना मिळाली. परिमंडल तीनचे सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेच्या पथकालासुद्धा तेथे पाचारण करण्यात आले. आरोपींचा शोध घेणेही पोलिसांना अडचणीचे झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Bhosari youth murder, two suspects arrested