शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत तरुणाची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोलपंप मालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 21:58 IST

पेट्रोलपंपावर मयत तेजस याने पैशांची अफरातफर केली, असे म्हणून आरोपीने तेजस याला बोलावून घेत मारहाण केली होती.

पिंपरी : तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. भोसरी येथे मंगळवारी (दि. १३) ही घटना उघडकीस आली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोलपंप मालकाला पोलिसांनीअटक केली आहे. 

तेजस सूर्यकांत तावरे (वय २३, रा. भोसरी, मूळ रा. लिंगी पिंपळगाव, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश सुरेश लांडगे (वय २८, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), असे अटक केलेल्या पेट्रोलपंप मालकाचे नाव आहे.  अमरजा सचिन पालकर (वय २५, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली), यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथील सदगुरुनगर येथे लक्ष्मी एनर्जी ॲण्ड फ्यूल पेट्रोल पंप आहे. आरोपी लांडगे हा या पंपाचा मालक आहे. पंपावर मयत तेजस याने पैशांची अफरातफर केली, असे म्हणून आरोपीने तेजस याला बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने त्याच्या ऑफिसमध्ये तेजसला मारहाण केली. तसेच त्याची दुचाकी व मोबाइल आरोपीने ठेवून घेतला. तसेच तुझ्या आईवडिलांना फोन करून सांगून पोलीस केस करतो, अशी धमकी आरोपीने दिली. तेजस याच्यावर आरोपीने दबाव टाकून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले. 

तेजस याने राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. तेजसला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, तेजसने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. मयत तेजस याची बहीण अमरजा पालकर यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी लांडगे याला पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकPetrol Pumpपेट्रोल पंप