भोसरीत पूर्ववैैमनस्यातून दोघांना मारहाण
By Admin | Updated: April 15, 2017 03:53 IST2017-04-15T03:53:08+5:302017-04-15T03:53:08+5:30
भोसरी येथील बालाजीनगरमधील वाचनालयासमोर गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून चार जणांनी दोघांना लोखंडी वस्तूने बेदम मारहाण केली.

भोसरीत पूर्ववैैमनस्यातून दोघांना मारहाण
पिंपरी : भोसरी येथील बालाजीनगरमधील वाचनालयासमोर गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून चार जणांनी दोघांना लोखंडी वस्तूने बेदम मारहाण केली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एक जण फरार झाला आहे.
रवी बाळासाहेब खंडागळे (वय २०), महेश बापू सावंत (वय २४, रा. बालाजीनगर, भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांना मनोज दिनकर गरड (वय ३०), दीपक दिनकर गरड (वय ३४), दिलीप रामभाऊ चिलारे (वय ३२) आणि संदीप रामभाऊ चिलारे (वय ३४, रा. सर्व बालाजीनगर, भोसरी) या चौघांनी मारहाण केली. याप्रकरणी महेश सावंत यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, मनोज, दीपक आणि दिलीप या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश आणि आरोपींमध्ये यापूर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून
गुरुवारी रात्री महेश व रवी बालाजीनगरमधील वाचनालयासमोर आले असता आरोपींनी त्यांना
लोखंडी वस्तूने मारहाण केली.
त्यात महेश आणि रवी दोघेही जखमी झाले आहेत.(वार्ताहर)