भोसरीत ‘सोन्याचा’ कचरा

By Admin | Updated: October 14, 2016 05:36 IST2016-10-14T05:36:41+5:302016-10-14T05:36:41+5:30

दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करून सोन्याची म्हणजे आपट्याच्या पानांची भरपूर लूट केल्यानंतर काल सोन्यासारखे महत्त्व असणाऱ्या फुलांचा

Bhosari 'gold' garbage | भोसरीत ‘सोन्याचा’ कचरा

भोसरीत ‘सोन्याचा’ कचरा

भोसरी : दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करून सोन्याची म्हणजे आपट्याच्या पानांची भरपूर लूट केल्यानंतर काल सोन्यासारखे महत्त्व असणाऱ्या फुलांचा व पानांचा आज कचरा झाल्याचे चित्र भोसरीत दिसून आले.
आपट्याच्या पानांना दसऱ्याच्या दिवशी महत्त्व आहे. या दिवशी प्रतीकात्मक सोनं म्हणून ही पाने वाटली जातात. फक्त खंडेनवमी व दसऱ्याच्या दिवशी फुलांच्या विक्रीतून एकट्या भोसरीत लाखो रुपयांची उलाढाल झाली, पण दसरा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भोसरी उड्डाणपूल व मंडई परिसरात फुलांच्या कचऱ्याचे ढीग पडलेले दिसून आले. फुलविक्रे त्यांनी आपल्या जवळ शिल्लक राहिलेला माल परत न नेता रस्त्यावरच टाकून दिल्याने शेकडो किलो फुले रस्त्यांवर पडून कचऱ्यात गेली. याच फुलांना व पानांना खतनिर्मिती विभागात योग्य पद्धतीने साठवून त्यापासून शेकडो टन पौष्टिक खत तयार करता येईल, याचा महापालिकेने विचार करणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
खंडेनवमीला सकाळपासूनच भोसरी उड्डाणपूल व बाजार परिसरात फुलविक्रे त्यांची लगबग होती. सकाळी ३० रुपये किलोच्या दराने झेंडूची फुले विक्री सुरवात झाली, तर काही ठिकाणी ५० रुपये किलो दराने संध्याकाळी उशिरापर्यंत विक्री करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी भोसरीत कित्येक टन फुलांची आवक झाली. ७० रुपये ते ९० रुपये किलो दराने शेकडो टन फुले व आपट्याची पाने भोसरीकरांनी खरेदी केली. परंतु, संध्याकाळी बाजार संपण्याच्या वेळेत पुन्हा फुलांचा भाव गडगडला व ९० रुपयांवरून १५ ते २० रुपये किलोच्या दराने विक्री सुरू झाली होती. पण, शेवटी रात्री उशिरापर्यंत चाललेली विक्री झाल्यानंतर फुलविक्रेत्यांकडे उरलेला माल परत नेण्यासाठी गाडीचे भाडे द्यावे लागेल व भुर्दंड सहन करावा लागेल. यामुळे कित्येक विक्रे त्यांनी फुले आहे त्याच जागेवर फेकून दिला. (वार्ताहर)

Web Title: Bhosari 'gold' garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.