शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा; 'संस्कार जत्रा २०१८'चे चिंचवडमध्ये उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:44 IST

संस्कार जत्रा २०१८चे उद्घाटन पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. चिंचवड मधील बिजलीनगर येथे विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळ पटांगणात या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना करण्यात आले सन्मानित

चिंचवड : संस्कार जत्रा २०१८चे उद्घाटन पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. चिंचवड मधील बिजलीनगर येथे विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळ पटांगणात या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी परिसरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत 'बेटी बचाओ, बेटी पाढाओ' या जनजागृती अभियानाचा नारा दिला.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मोहन गायकवाड, हभप मंगला कांबळे, प्रशासन अधिकारी बजरंग आवारी, ब प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, प्रभाग अधिकारी दिपक आमडेकर, टाटा मोटर्सचे एन. एस. दिवेकर, कामगार कल्याण मंडळाचे प्रमुख प्रदीप बोरसे, सामाजिक कार्यकर्त्या निता परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. आकुर्डीतील प्राथमिक विद्यालयाचे विकास गायकवाड यांना संस्काररत्न, डॉ. सुधाकर पेटकर यांना योगरत्न, रामदास जंगम यांना समाजरत्न, जिल्हा परिषद शाळेचे प्रकाश घोडके यांना 'कला रत्न', सरस्वती विद्यालय आकुर्डीच्या विद्या भालेराव यांना संस्काररत्न व अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी समृद्धी यादव हिला 'कलारत्न' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.स्लोगन स्पर्धेत अस्मिता गुरव प्रथम क्रमांक, विकास गायकवाड यांना द्वितीय, सुखदेव आमले यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. सुनीता तिकोने व ज्योती तापकीर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. बेटी बचाओ अभियानात न्यू इंग्लिश स्कूल (बिजलीनगर), गुड शेफर्ड स्कूल (बिजलीनगर), श्री गोदावरी विद्यालय (चिंचवड) व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राथमिक विद्यालय (आकुर्डी) यांनी सहभाग घेतला. प्रकाश शेंडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकर