शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

खड्डे बुजविण्यास सुरुवात; वाहनचालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 03:45 IST

वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर या साधारणत: २ ते ३ किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

रावेत : वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर या साधारणत: २ ते ३ किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे. नुकत्याच दमदार सुरू झालेल्या पावसाने परिसरातील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वाल्हेकरवाडी-रावेत रस्त्यांची चाळण झाली होती. या बाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची महापालिकेच्या ब प्रभाग प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन रस्त्यावरील काही खड्डे मुरूम टाकून बुजविण्यास सुरुवात केली आहे.या मुख्य रस्त्या लगत असणाऱ्या एकवीरा कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी आणि नंदनवन कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ निर्माण झालेले मोठे खड्डे खडी टाकून महापालिका प्रशासनाने बुजविल्याने येथील रहिवाशांना होणारा त्रास कमी झाला आहे. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने येथे अपघात नित्याचे झाले आहेत. रस्त्यांवर खड्डे आणि त्यातून चिखल अंगावर उडवत वेगाने जाणारी वाहने यांमुळे चालायचे तर कुठून या प्रश्नाने नागरिक हैराण झाले होते. मागील काही दिवसांपासून खºया अर्थाने दमदार पावसास सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते खचण्यास सुरवात झाली आहे. या रस्त्यांवर तर केवळ खड्ड्यांचे साम्राज्य आहे. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना, वाहनचालकांना खो खो खेळत या रस्त्यावरून ये-जा करावी लागत होती. त्यातच पावसाने जोर धरल्याने रस्त्यांची वाताहात झाली आहे. मात्र स्मार्ट सिटीचा डांगोरा पिटत दर्जेदार पायाभूत सुविधांचा गवगवा करणाºया महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या दुरवस्थेकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. परिणामी रस्ते खड्ड्यांनी भरलेले दिसून येत आहेत. पावसात त्या खड्ड्यांमध्ये साचणाºया पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाजच येत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर वाहनधारकांना त्यातून जाताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी रस्ता उंच तर काही ठिकाणी सखल झाल्याने या भागात अपघात होत आहेत. या भागातील रस्त्यांची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. या मार्गावरून दररोज वाहनांवर जाणाºया वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.वाल्हेकरवाडी-रावेत रस्ता येथील शेतकºयांच्या शेतीतून जातो. त्यांना प्राधिकरण प्रशासनाकडून जागेचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित शेतकºयाने त्यांच्या जागेतून जाणाºया रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्रशासनास विरोध केला आहे. त्यामुळे साधारण २५० मीटर अंतरावरील खड्डे बुजविता आले नाहीत. त्यामुळे खड्डे ‘जैसे थे’ आहेत.या रस्त्यासाठी शेतकºयांचा विरोध कायम असल्याने उर्वरित भागातील खड्डे बुजविण्यास अडचण निर्माण होत आहे़ आम्ही या बाबत सदर शेतकºयास भेटून खड्डे बुजविण्यासंबंधी आपण अडवणूक करू नये, अशी विनंती केली होती़ परंतु सदर शेतकरी आपल्या मतावर ठाम असल्याने उर्वरित रस्त्यावरील खड्डे बुजविता आले नाहीत़ परंतु लवकरच संबंधित शेतकरी, प्रभागातील सर्व नगरसेवक आणि प्राधिकरण प्रशासन यांची बैठक आयोजित करू. - करुणा चिंचवडे, ‘ब’ प्रभाग अध्यक्षा

टॅग्स :ravetरावेतPotholeखड्डे