शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

मोठ्या आवाजातील होम थिएटरवरून एकमेकांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 00:35 IST

माणची घटना : दोन्ही गटांची परस्परविरोधी तक्रार

पिंपरी : माण येथे दोन गटांत झालेल्या मारहाणप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना येथील टीसीजी कंपनीजवळील लेबर कॅम्प येथे रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.

मुकिंदा गोविंद पवार (वय ३८, रा. टीसीजी कंपनी साईट, फेज ३, माण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नुर आलम अली खान (वय २१), राहुल शेषराम चव्हाण (वय २४) अशी गुन्हा दाखल केलेल्यांचे नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपींनी त्यांच्या घरात मोठ्या आवाजात होम थिएटर लावला होता. त्या वेळी मुकिंदा पवार यांचा मित्र अनिल वाव्हळे हे नुर याच्याकडे गेले व त्यास आवाज कमी करण्यास सांगितले. त्या वेळी नुर याने वाव्हळे यांच्या पायावर रॉड मारला. तसेच फिर्यादी पवार यांच्या डोक्यात चव्हाण याने रॉड मारला. यासह इतर दोघांनी फिर्यादीच्या दोन मित्रांना सळईने डोक्यात मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली. तसेच नुर आलम मोहम्मद अली (वय २१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुकिंदा गोविंद पवार, अनिल गौतम वाव्हळे (वय २१) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपींनी यातील फिर्यादी नुर व त्यांचा मित्र राहुल शेषराव चव्हाण यांना लोखंडी रॉडने मारहाण केली व त्यांचा मित्र महम्मद इरफान रफिक खान, मुस्तफा महम्मद अली (वय २२) यांना इतर दोघांनी सळइने डोक्यात मारहाण केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी