शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

सावधान! फसवणुकीसाठी होतोय मोबाइल अॅपचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 11:32 AM

दुसऱ्या व्यक्तीचे नाव वापरून केला जातोय खोडसाळपणा  

ठळक मुद्देफोनच्या क्रमांकामुळे होतोय घोळवैयक्तिक वादातून विचित्र नावाने नोंद

नारायण बडगुजर

पिंपरी : स्मार्ट फोनमुळे मोबाइलधारक सोशल मीडियाच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. त्यामुळे शेकडो अ‍ॅप्लीकेशन्स मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले जातात. यात कॉलर आयडी दर्शविणाºया ट्रु कॉलर यासारख्या काही अ‍ॅप्सचाही समावेश आहे. आपल्याला फोन करणाºयाचे नाव आदी माहिती या अ‍ॅप्समुळे उपलब्ध होते. याचाच गैरफायदा गुन्हेगारांकडून घेतला जात आहे. या अ‍ॅप्सचा दुरुपयोग करून फसवणुकीचे प्रकार होत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एका नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या स्मार्टफोनवर एक फोन आला. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा पीए बोलत असून, गरिबांना मदतीसाठी २५ लाख रुपये द्या, अन्यथा बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यामुळे संबंधित फोन क्रमांकाबाबत माहिती घेण्यात आली. त्यासाठी कॉलर आयडी दर्शविणाऱ्य ट्रु कॉलर आदी अ‍ॅप्सचा वापर करण्यात आला. आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव कॉलर आयडी म्हणून संबंधित अ‍ॅप्सवर दिसून येत होते. मात्र प्रत्यक्षात सदरच्या फोन क्रमांकाचे सिमकार्ड चोरीचे होते. सदरचा फोन क्रमांक आपला नसून, आपण किंवा आपल्या कार्यालयातून असा फोन कोणीही केला नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वस्तूस्थिती समोर आली.कॉलर आयडीबाबत माहिती दर्शविणाऱ्यया ट्रु कॉलरसारख्या अ‍ॅप्सवर चोरट्यांनी सदरचा फोन क्रमांक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने नोंद केला. त्यामुळे त्या क्रमांकावरून कोणालाही फोन केल्यास आमदार पाटील यांचे नाव संबंधित मोबाइलवर दिसून येत होते. आमदार पाटील यांनी फोन केला आहे, असा समज संबंधित मोबाइलधारकाचा होत असे. यातून गुन्हेगारांचा मनसुबा पूर्ण होत असे.  वैयक्तिक वादातून विचित्र नावाने नोंदप्राणीमित्र महिला आणि परिसरातील काही नागरिकांमध्ये मोकाट कुत्र्यांवरून वाद झाला. पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद गेला. मात्र दोन्ही बाजूंकडून सामंजस्य दाखविण्यात आले नाही. किरकोळ असला तरी वाद सातत्याने होत आहे. त्यामुळे यातील काही नागरिकांनी संबंधित महिलेचा मोबाइल क्रमांक ट्रु कॉलरसारख्या अ‍ॅप्सवर ' यमराज ' नावाने नोंदविला. परिणामी त्या महिलेचा फोनक्रमांक संबंधित अ‍ॅप्सवर 'यमराज'नावाने दिसून येतो. किरकोळ वादातून व गैरसमजातून काही नागरिकांनी मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर हा खोडसाळपणा केला असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येते. 

ट्रु कॉलरमुळे होते मदत...ट्रु कॉलरसारख्या अ‍ॅप्समुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांना मोठी मदत होते. आपल्या फोनवर आलेल्या अनोळखी क्रमांकाबाबत माहिती मिळते. फोन करणाºया व्यक्तीचे नाव, शहर, व्यवसाय आदींबाबत अशा अ‍ॅप्सवरून तपशील उपलब्ध होतात. तसेच नको असलेले कॉल्स अर्थात स्पॅम कॉल्स आदींबाबतही अशा अ‍ॅप्समुळे माहिती मिळते. त्यामुळे आवश्यक असलेलेच कॉल्स स्वीकारण्यास मदत होते. 

फोनच्या नवीन क्रमांकांबाबत घोळफोनचे नवीन क्रमांक घेतल्यानंतर आपले नाव अशा अ‍ॅप्सवर नेमके काय आहे, याची पडताळणी करणे आवश्यक असते. संबंधित क्रमांक आपल्याला मिळण्यापूर्वी ज्या व्यक्तिचा असेल त्याच्याच नावाने तो ट्रु कॉलरवर दर्शविला जातो. त्यामुळे नवीन क्रमांक घेतलेल्या मोबाइलधारकाबाबत गैरसमज होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी फोनचा नवीन क्रमांक घेतल्यानंतर अशा अ‍ॅप्समधून संबंधित क्रमांक वगळण्याची प्रक्रिया करावी लागते किंवा आपल्याला पाहिजे त्या नावाने तो क्रमांक ट्रु कॉलरवर अपडेट करणे आवश्यक असते. 

आपल्या मोबाइलवर येणाऱ्या प्रत्येक अनोळखी फोन क्रमांकाबाबत आपण सतर्क राहिले पाहिजे. अशा क्रमांकाच्या नाव व इतर माहितीबाबत ट्रु कॉलरसारख्या अ‍ॅप्सवरील माहितीवर विसंबून राहू नये. स्वत: प्रत्यक्ष खातरजमा करावी. अनोळखी क्रमांकावरील व्यक्ती आपली फसवणूक किंवा गुन्हेगारी कृत्य करीत नाही ना, याबाबत खात्री करावी.- संभाजी जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी