बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!

By Admin | Updated: September 29, 2015 02:07 IST2015-09-29T02:07:25+5:302015-09-29T02:07:25+5:30

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खडकी, रावेत, नेहरुनगर परिसरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या दणदणाटात रात्री उशिरापर्यंत

Bappa, come early next year! | बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!

बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!

पिंपरी : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खडकी, रावेत, नेहरुनगर परिसरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या दणदणाटात रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मिरवणुका शांततेत पार पडल्या.
पुढच्या वर्षी लवकर या... अशी
घोषणा देत परिसरातील मंडळांच्या आणि घरगुती गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. या वेळी विसर्जन घाटावर मोठी गर्दी होती.
-------------
खडकी : ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, फुलांच्या सजावटीत विराजमान बाप्पापुढे हवेत उंच पताका भगवे ध्वज फडकावत, सर्व परिसर भक्तिमय झाला होता. प्रत्येक मंडळाने वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला. त्यात खडकी मार्केट, मधला बाजार, मित्र सागर, बाल मित्र, अमर शिवराज मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक मनाचा ठाव घेणारी ठरली.
महादेव मंदिर घाटावर १८५५ घरगुती, ४० मोठ्या व ३० लहान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांचे आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथांतून ढोल-ताशा, ढोल-लेझीम व पारंपरिक वाद्यांच्या निनादात उत्साहात भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
शिवाजी पुतळा येथून दुपारी १२ वाजता मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. बोर्डाचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
वेगळेपण जपणाऱ्या विठ्ठल मंदिर देवस्थानची मिरवणूक सर्वप्रथम पालखीतून निघाली. महिलांचा ताल धरत रिंगणनृत्य आकर्षणाचा विषय ठरला. गवळीवाडा मित्र मंडळाने यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाला मात व कुटुंबांना साथ या मोहिमेवर मिरवणुकीतील खर्च कमी करून पालखीतून विसर्जन सोहळा पार पाडला. विलास मारटकर यांच्या पुढाकाराने मंडळांनी ही अनोखी मोहीम राबविली गेली. मानाचा पहिला गणपती नूतन तरुण मंडळाने बँड पथक व निर्भीड संघाच्या ढोल पथकाने मुख्य मिरवणूक सुरुवात झाली. मंडळाने यंदा देखावा न करता दुष्काळग्रस्तांना मदतीचा मानस ठेवला आहे. मानाचा दुसरा गणपती मधला बाजार मंडळात अग्रभागी असलेल्या मोरया ढोल पथकाने पुन्हा एकदा खडकीकरांची मने जिंकली. मंडळाने तयार केलेला आकर्षक रथ लक्ष वेधून घेत होता. खडकी मार्केटच्या मिरवणुकीत जय मल्हारवरील जिवंत देखावा व नृत्यकला सादर करणाऱ्या पथकातील युवक व युवती उपस्थितांचे आकर्षण ठरले. (वार्ताहर)
------------

Web Title: Bappa, come early next year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.