शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्डची अफरातफर करत नागरिकांना लुबाडणारी टोळी जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 20:38 IST

पुणे व ठाणे जिल्ह्यातील विविध भागात बँकेतील एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी अालेल्या नागरिकांकडील एटीएम कार्डची हातचलाखीने अफरातफर करत नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या उल्हासनगर येथील एका टोळीतील मुख्य सूत्रधारासह दोघांना जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांना यश आले आहे.

लोणावळा : पुणे व ठाणे जिल्ह्यातील विविध भागात बँकेतील एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी अालेल्या नागरिकांकडील एटीएम कार्डची हातचलाखीने अफरातफर करत नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या उल्हासनगर येथील एका टोळीतील मुख्य सूत्रधारासह दोघांना जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांना यश आले आहे.या टोळीने पुणे जिल्ह्यात चार व ठाणे जिल्ह्यात सात ठिकाणी एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारला असल्याची कबुली चौकशी दरम्यान दिली आहे.     मनोज उर्फ मनीष उर्फ मन्या दत्तू सोनवणे (रा.701, शंकर हाईट्स, चिंचपाडा, अंबरनाथ, ठाणे ) असे या टोळीतील मुख्यसूत्रधाराचे नाव असून महेश पांडुरंग घनघर ( रा. उल्हासनगर, ठाणे) अशी बनावट एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत चोरट्यांचे नाव आहे. घनघर याच्या विरोधात यापूर्वी ठाणे जिल्ह्यात सात गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील आणखी तिघेजण फरारी असून, पुणे व ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहे.     लोणावळा शहर व पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ५ ऑगस्टला लोणावळ्यातील  स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) येथील एटीएम मध्ये लोणावळ्यातील तुंगार्ली येथील सुशील धोंडिबा धनकवडे ( वय-६१) हे त्यांचे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी  यातील आरोपींनी धनकवडे यांच्यावर लक्ष ठेवत आरोपींनी त्यांच्याकडील बनावट एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करून धनकवडे यांचे एटीएम कार्ड हस्तगत करत त्याव्दारे धनकवडे यांच्या खात्यातून ३ लाख ४० हजार रुपये काढून पोबारा केला होता. या घटनेचे दृश्य येथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्याचप्रमाणे या टोळीने सामान्य नागरिकांसोबत पोलीसांना देखिल गंडा घातलेला आहे.    पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस नाईक वाजे यांच्या मुलीच्या  एटीएम कार्डचीही हातचलाखीने अदलाबदल करून खेड (राजगुरुनगर) येथील एटीएम खात्यातून सुमारे १२ लाख रुपये काढून पोबारा केला होता. यामुळे बनावट एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करून नागरिकांच्या जीवनाच्या पुंजीवर डल्ला मारण्याची अनोखी पद्धत वापरून एटीएम मधून पैसे हडप होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत झाली होती. यामुळे या प्रकरणाचा तपास लावणे हे एक मोठे आव्हान पोलीसांच्या समोर होते.     लोणावळा शहर व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या सर्व ठिकाणच्या घटनेच्या प्रकारांचा अभ्यास व तपास करून पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेज हक, अप्पर पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या ठिकाणी मिळालेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे उल्हासनगर येथील काही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीसी हिसका दाखविताच या टोळीतील मुख्यसूत्रधारासह ताब्यात घेतलेल्या त्याच्या साथीदाराने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांची अधिक चौकशी केली असता या टोळीने पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी फसवणूक केले असल्याचे सांगितले आहे. यामध्ये लोणावळा शहर व बारामती येथे प्रत्येकी एक व खेड (राजगुरुनगर) येथे दोन घटनांचा समावेश आहे. तसेच महेश घनघर याच्या विरोधात ठाणे जिल्ह्यात सात ठिकाणी गुन्हे दाखल असून, यामध्ये कल्याण, अंबरनाथ, शिक्रापूर येथे प्रत्येकी दोन व मुरबाड येथे एक समावेश आहे.     या दोघांना वडगाव न्यायालयात हजर केले असता वडगाव न्यायालयाने १६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीण  स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा