शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था : लक्ष्मण जगताप यांच्याकडून अधिकारी धारेवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:15 IST

या महामार्गाची दुरावस्था तातडीने दूर करण्यासोबतच महामार्गालगत तातडीने सुशोभीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देआमदार जगताप यांची अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्गाची पाहणी सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याची सूचनाही

पिंपरी : शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांना आॅन दि स्पॉट नेत महामार्गाची झालेली दुरावस्था दाखवली. या महामार्गाची दुरावस्था तातडीने दूर करण्यासोबतच महामार्गालगत तातडीने सुशोभीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे-मुंबई हा देशातील पहिला द्रुतगती महामार्ग आहे. हा द्रुतगती मार्ग सहापदरी करण्याचे काम एका कंपनीला मिळालेले आहे. या कंपनीमार्फत सध्या काम सुरू आहे. हा महामार्ग वाकड ते रावेत-किवळे दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून जातो. पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे सुशोभीकरण केलेले नाही. त्याचप्रमाणे या महामार्गाच्या शेजारचे सर्व्हिस रस्ते चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. या सर्व बाबींची दखल घेत जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी बैठकीसाठी बोलविले होते. त्या बैठकीत त्यांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील दुरावस्थेबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला. महामार्गाची दुरावस्था दूर करण्यासाठी पुरेसे लक्ष दिले जात नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुशोभिकरण करण्यासाठी आजपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचे सुनावले. निष्क्रिय कारभार खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. वाहनचालकांना द्रुतगती महामार्गावर प्रवासाला अडथळा येऊ नयेत यासाठी उभारण्यात आलेल्या ग्रेड-सेपरेटर, सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था, महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडेझुडपे, त्यांनी अधिकाऱ्यांना दाखवले. ही सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याची सूचनाही केली.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गLakshman Jagtapलक्ष्मण जगताप