शहराला पुरस्कार ही आनंददायी बाब

By Admin | Updated: February 17, 2016 00:51 IST2016-02-17T00:51:26+5:302016-02-17T00:51:26+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे लोकप्रतिनिधी, प्रशासन, विविध सामाजिक संस्थांच्या आणि नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ शहर हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Awards to the city are pleasurable | शहराला पुरस्कार ही आनंददायी बाब

शहराला पुरस्कार ही आनंददायी बाब

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे लोकप्रतिनिधी, प्रशासन, विविध सामाजिक संस्थांच्या आणि नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ शहर हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्राने केलेल्या पाहणीत आपण राज्यात पहिला आणि देशात नववा क्रमांक पटकाविला, ही आनंददायी गोष्ट आहे, अशी भावना आयुक्त राजीव जाधव यांनी व्यक्त केली.
दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात महापौर शकुंतला धराडे आणि आयुक्त राजीव जाधव यांनी महापालिकेच्या वतीने सन्मान स्वीकारला. याविषयी बोलताना जाधव म्हणाले, ‘‘शहरात आल्यापासून मी स्वच्छता अभियानास महत्त्व दिले आहे. दोन वर्षांपासून महापालिकेचे पदाधिकारी, प्रशासन, सामाजिक संस्था, नागरिकांच्या सहभागातून विविध स्वच्छताविषयक उपक्रम राबविले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्टच्या माध्यमातून एकाच दिवशी सुमारे चार हजार कार्यकर्त्यांनी चाळीस ठिकाणांची स्वच्छता केली.(प्रतिनिधी)

Web Title: Awards to the city are pleasurable