शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video : कुत्र्याला मारायला गेला लाथ अन्‌ रिक्षाचा झाला अपघात; सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 09:51 IST

या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. त्याचे फुटेज शनिवारी रात्री सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

पिंपरी : भरधाव रिक्षाच्या चालकाने रस्त्यात थांबलेल्या कुत्र्याला लाथ मारायचा प्रयत्न केला आणि त्याचा रिक्षावरील ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा दुभाजकावर चढली. यात चालक रिक्षातून रस्त्यावर पडला आणि रिक्षा चक्क दुभाजकावर धावली.

सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचा हा व्हिडीओ पिंपरी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी कॅम्पातील कराची चौक ते डिलक्स चौकादरम्यान हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार शगुन चौकातून डिलक्स चौकाकडे भरधाव जात असलेल्या रिक्षाचालकाने रस्त्यात थांबलेल्या कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न केला. भांबावलेल्या कुत्र्याने भुंकायला सुरवात केली. त्यामुळे रिक्षातील चालक घाबरला आणि रिक्षावरील त्याचा ताबा सुटला. यात रिक्षा तेथील दुभाजकावर चढली. त्यामुळे चालक रिक्षातून रस्त्यावर पडला. त्यानंतरही रिक्षा दुभाजकावर धावून रस्त्याच्या दुस-या बाजूला गेली. त्यावेळी काही जणांनी सतर्कता दाखवत रिक्षाला थांबवले. त्यावेळी सुदैवाने विरुद्ध दिशेने वाहन येत नव्हते. त्यामुळे रिक्षाची इतर कोणत्याही वाहनाला धडकली नाही. तसेच वेळीच रिक्षाला थांबवल्याने तेथील दुकानांचेही नुकसान टळले.  

घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैदअपघाताची ही घटना काही सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये कैद झाली. त्याचे फुटेज शनिवारी रात्री सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. रिक्षाचालकाने केलेल्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले. मात्र याबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. 

अपघात झाल्याची माहिती नाही. तसेच त्याबाबत कोणीही माहिती देण्यासाठी आले नाही. अशा कोणत्याही घटनेची नोंद नाही.- मिलिंद वाघमारे, वरिष्ठ निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdogकुत्राAccidentअपघातauto rickshawऑटो रिक्षाcctvसीसीटीव्हीSocial Mediaसोशल मीडिया