शहरातील आठ टक्के सोसायट्यांचे आॅडिट
By Admin | Updated: July 29, 2016 03:51 IST2016-07-29T03:51:03+5:302016-07-29T03:51:03+5:30
शहरातील गृहरचना सोसायट्यांना लेखापरीक्षण (आॅडीट) करणे बंधनकारक आहे़ परंतु सुमारे ५५०० सोसायट्यांपैकी फक्त ४०० सोयायट्यांनी लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केला आहे़

शहरातील आठ टक्के सोसायट्यांचे आॅडिट
पिंपरी : शहरातील गृहरचना सोसायट्यांना लेखापरीक्षण (आॅडीट) करणे बंधनकारक आहे़ परंतु सुमारे ५५०० सोसायट्यांपैकी फक्त ४०० सोयायट्यांनी लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केला आहे़
उपनिबंधक प्रतीक पोखरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या नियमाप्रमाणे लेखापरीक्षण पुर्ण करण्याची मुदत ३१ जुलैपर्यत आहे़ तर ३१ आॅगस्टपर्यंत लेखापरीक्षण सहकारी संस्थेकडे सादर करावयाचे आहे़ सहकार विभागाच्या नेमून दिलेल्या लेखापरीक्षकांकडून गृहरचना सोसायट्यांचे लेखापरीक्षण करुन घेणे गरजेचे आहे़ परंतू शहरातील हजारो सोसायट्यांनी लेखापरीक्षण केले नाही, शहरातील प्रत्येक सोसायट्यांनी ३०सप्टेंबरपूर्वी संस्थेची वार्षिक सभा घेणे बंधनकारक आहे़ या नियमांना अनेक सोसायट्यांनी सोयिस्कररित्या बगल दिली आहे़ त्यामुळे सहकार संस्था कायदा
१४९ नुसार सोसायट्यांचे पदाधिकारी आणि संस्थांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पोखरकर यांनी सांगितले आहे़
ज्या सहकारी संस्थांनी वेळेत लेखापरिक्षण केले नाही, कागदपत्रांची पूर्तता केली नाही, नोटिशीला उत्तर दिले नाही अशा ९४ संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे़ सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या सूचनेनुसार या वर्षी १०० टक्के लेखापरीक्षणाचे उद्दिष्ट आहे़ (प्रतिनिधी)