शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोडमध्ये गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न;सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक 

By प्रकाश गायकर | Updated: February 21, 2025 17:52 IST

इंद्रा आणि त्यांचा मित्र साई भीम रेड्डी हे नंदकिशोर यादव यांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले

पिंपरी : देहूरोड येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमात येऊन भांडण करणाऱ्यांना समजावत असताना गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक केली आहे. याच घटनेत दोन गोळ्या लागल्याने एकाचा मृत्यू झाला होता.ही घटना १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता आंबेडकरनगर, देहूरोड येथे घडली. मलिक कुमार इंद्रा (वय १८, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साबीर समीर शेख (२४), फैजल खान (२४), जॉनी ऊर्फ साइतेजा चित्तामल्ला (२४), अभिषेक रेड्डी (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह साकिब जिलानी, दिनेश कानेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंद्रा आणि त्यांचा मित्र साई भीम रेड्डी हे नंदकिशोर यादव यांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते घराबाहेर गप्पा मारत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी नंदकिशोर यादव यांच्याशी वाद घातला. त्यामुळे ते भांडण सोडविण्यासाठी इंद्रा आणि त्याचा मित्र रेड्डी गेले.त्यावेळी आरोपी साबीर याने गोळीबार करत रेड्डी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान इंद्रा आणि रेड्डी हे दुचाकीवरून पळून गेले. इंद्रा हे या घटनेत घाबरल्यामुळे ते गुरुवारी पोलिस ठाण्यात आले आणि गुन्हा दाखल केला. याच घटनेत साबीर याने एका व्यक्तीवर गोळीबार करून ठार मारले. त्याबाबत वेगळा गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस