शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

पुरातन काळातील धातूच्या नाण्याची विक्री करत फसवणुकीचा प्रयत्न; नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:58 PM

गुरुवारी दुपारी आकुर्डीतील खंडोबामाळ येथे ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी : पुरातन काळातील धातूचे नाणे विकून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नऊ जणांना निगडी पोलिसांनीअटक केली आहे. आरोपींनी आपसात संगनमत करून होमगार्ड वैभव तावरे यांना पुरातन काळातील धातूचे नाणे, लिबो कॉईन ज्यामध्ये हाय इरिडियम नावाचे केमिकल आहे. यामुळे या नाण्याला बाजारात दहा कोटी रुपयांची किंमत आहे, असे भासवून फसवणुकीच्या हेतूने होमगार्ड तावरे यांना विकण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलीस नाईक कंठय्या गुरय्या स्वामी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी दुपारी खंडोबामाळ, आकुर्डी येथे ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी हरीश परशुराम पाटील (वय ६८, रा. औरंगाबाद), संजय अर्जुन कुचेकर (वय ४२ रा. खराडी, पुणे), सुजित राजेंद्र सारफळे (वय २१, रा. उस्मानाबाद), प्रमोद रामचंद्र बचाटे (वय ४०, रा. उस्मानाबाद), राजेश विजयकुमार गोवर्धन (वय ४१, रा. उस्मानाबाद), रत्नाकर विजय सावंत, किशोर ज्ञानेश्वर भगत (वय ३६, दोघे रा. गोपाळनगर, डोंबिवली पूर्व), इमरान हसन खान (वय ४३, रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींकडून सात लाख रोख रक्कम, एक पुरातन काळातील नाणे, १,१९,५०० रुपये किमतीचे ९ मोबाईल, ८,५०,००० रुपये किमतीच्या दोन कार, असा एकूण १६ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला

---

टॅग्स :akurdiआकुर्डीPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी