निगडीत सराईत वाहनचोरास अटक
By Admin | Updated: October 17, 2015 00:58 IST2015-10-17T00:58:49+5:302015-10-17T00:58:49+5:30
पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास निगडी पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडील सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

निगडीत सराईत वाहनचोरास अटक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास निगडी पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडील सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी स्टेशनकडे जाणाऱ्या संभाजी चौक परिसरात एक सराईत चोरीचे वाहन घेऊन येत असल्याची माहिती हवालदार फारुख मुल्ला व सुनील शिंदे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी चौक येथे सापळा रचून पोलिसांनी दुचाकीचोर करण किरण बेद (रा. बडा मस्जिदजवळील झोपडपट्टी, पिंपरी) याला अटक केली आहे. चोरट्याकडून पिंपरी, भोसरी, निगडी या ठिकाणांहून चोरलेल्या १ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी हस्तगत करून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)