दाद कुणाला मागायची?
By Admin | Updated: July 23, 2015 04:41 IST2015-07-23T04:41:08+5:302015-07-23T04:41:08+5:30
विठ्ठलनगर झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना २०१०-२०११ या कालावधीमध्ये पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीमध्ये घरांचा ताबा दिला. तेव्हापासून

दाद कुणाला मागायची?
विठ्ठलनगर झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना २०१०-२०११ या कालावधीमध्ये पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीमध्ये घरांचा ताबा दिला. तेव्हापासून त्या इमारतीतील रहिवाशांना उणिवा जाणवू लागल्या.
या इमारतीचे बांधकाम आरसीसी पद्धतीचे आहे. वाळू व ढस यांचा वापर केल्यामुळे बांधकाम मजबूत नाही. तसेच, पावसाळ्यामध्ये सातव्या मजल्यावर पाणी झिरपत असते. तसेच काही काही इमारतींमध्ये वरच्या मजल्यावरील बाथरूम किंवा स्वच्छतागृहामधून खाली राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये पाणी गळते. पावसाळ्यामध्ये टेरेसवरून पावसाचे पाणी खाली साचते. तसेच, सात मजली बिल्डिंगसाठी ड्रेनेजलाइन थोडी मोठी करण्याची आवश्यकता होती. तसेही झाले नाही. कधी कधी ड्रेनेजमध्ये कचरा अडकून ड्रेनेज बंद पडते.
तसेच, पुनर्वसन प्रकल्प करताना ज्या लोकांची दुकाने आहेत, त्यांना इमारतीमध्ये गाळे देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अद्यापपर्यंत एकही गाळा बांधण्यात आला नाही. तसेच, काही दुकानदारांनी दुसऱ्याच्या घरामध्ये दुकाने चालू केली आहेत. तरी, दुकानदारांना गाळे देण्याचे आश्वासन फोल ठरले आहे.
तसेच, विठ्ठलनगर तीन बालवाड्या आहेत. त्यांचे पुनर्वसन कसे करायचे, तसेच विठ्ठलनगर पुनर्वसन इमारतीच्या मोकळ्या जागेमध्ये मुलांसाठी बगिचा बनवण्याचे नियोजन होते. तेही झाले नाही. तसेच, विठ्ठलनगरमधून बाहेर पडण्यास एकच रस्ता असल्याने त्या रस्त्यावरून सर्व वाहनांना जावे लागते. तसेच, चारी बाजूंनी सीमाभिंत असल्याने दुसरा कोणता रस्ताही काढता येत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांच्या मनामध्ये आपण कोंडवाड्यात असल्यासारखी स्थिती निर्माण होते.
विठ्ठलनगर परिसरात वयस्कर लोकांची संख्याही खूप असल्याने सातव्या मजल्यावर राहणाऱ्या वयस्कर लोकांची दमछाक होते. इमारतीमधील लिफ्ट दिवसभर चालवणे वीजबिलामुळे परवडत नाही. लिफ्ट फक्त सकाळी तीन तास, संध्याकाळी चार तास चालू असते. तसेच, लिफ्ट बंद पडल्यामुळे वयस्कर लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. (वार्ताहर)