शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम : यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:11 IST

- आषाढी वारीत तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी अत्यावश्यक सेवा, मोबाइल ॲपद्वारे रुग्णाची अचूक माहिती मिळणार

- राजेंद्र काळोखे 

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक वैद्यकीय सेवा १०८ आरोग्य विभाग विशेष तयारी केली आहे. यंदा राज्यभरातून येणाऱ्या १० मान्यवर पालख्यांसोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका आणि कार्डियाक रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत.

या आरोग्य सेवेच्या सोबतच वारकऱ्यांसाठी ‘समारिटन (SAMARITAN) म्हणजे चांगले नागरिकत्व’ हे नवं मोबाइल ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून वारकऱ्यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळेल आणि रुग्णवाहिका चालकाला रुग्णाची नेमकी जागा त्वरित कळणार आहे, ज्यामुळे वेळेवर उपचार होण्यास मदत होईल. डॉ. प्रियांका जावळे म्हणाल्या, “शंभरपेक्षा जास्त रुग्णवाहिकांमध्ये प्रत्येक वाहिकेत डॉक्टर व चालक तैनात राहणार आहेत. यामध्ये आवश्यक औषधी व उपकरणे उपलब्ध असतील. या रुग्णवाहिका देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर, सासवड ते पंढरपूर आणि राज्यातील इतर मान्यवर पालखीसोबत वारीच्या प्रत्येक टप्प्यावर तैनात राहतील.”

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग आणि एसपीईआरओ यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेल्या ‘समारिटन’ ॲप्लिकेशनमुळे वारकऱ्यांना उपचारासाठी तत्काळ मदत मिळण्याची शक्यता वाढणार आहे. या ॲप्लिकेशनला ॲपल स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येते.

वारकऱ्यांना या ॲपच्या माध्यमातून प्राथमिक उपचाराबाबतही माहिती मिळेल, ज्यामुळे रुग्णवाहिका येईपर्यंत आवश्यक मदत दिली जाऊ शकेल. डॉ. जावळे यांनी या उपक्रमाची माहिती श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांना दिली आहे. आरोग्य विभाग आणि संबंधित संस्थांनी वारकऱ्यांना या सुविधांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022