शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

उदित नारायण यांना आशा भोसले पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 9:54 PM

नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो.

ठळक मुद्देपुरस्काराचे यंदाचे सोळावे वर्ष उदित नारायण यांच्या गीतांवर आधारित मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा हा कार्यक्रम

पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखा, सिद्धी विनायक ग्रुपच्या वतीने भारतीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारा संगीतकार आणि गायकास प्रसिद्ध गायिक आशा भोसले यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली .नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे  २००२ पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो. भाऊसाहेब भोईर म्हणाले, पुरस्काराचे यंदाचे सोळावे वर्ष असून हा पुरस्कार स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायसक अनु मलिक, शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा , सुरेश वाडकर, हरिहरन व सोनू निगम, सुनिधी चौहान यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. यंदाचा सोळावा पुरस्कार  होत आहे. १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उदित नारायण यांनी ३२ भाषांत अठरा हजार गाणी गायली असून लतातदीदी बरोबर २०० गाणी तर आशातार्इंबरोबर चारशेहून अधिक गाणी गायली आहेत.  पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ४ आॅगस्टला सायंकाळी साडेपाचला पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे होणार आहे.  यावेळी माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते अजित पवार, जेष्ठ संगीतकार पं.ह्रदयनाथ मंगेशकर, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप आदी उपस्थित राहणार आहे. यावेळी उदीत नारायण यांच्या  गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत  रजनीगंधा  हा कार्यक्रम रसिकांसाठी सादर होईल.

टॅग्स :PuneपुणेUdit Narayanउदित नारायणAsha Bhosaleआशा भोसले