अर्थसंकल्पास ५६ कोटींच्या उपसूचना

By Admin | Updated: February 19, 2016 01:17 IST2016-02-19T01:17:23+5:302016-02-19T01:17:23+5:30

महापालिकेच्या आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने ५६ कोटींच्या उपसूचना दिल्या आहेत.

Approximate 56 crores budget | अर्थसंकल्पास ५६ कोटींच्या उपसूचना

अर्थसंकल्पास ५६ कोटींच्या उपसूचना

पिंपरी : महापालिकेच्या आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने ५६ कोटींच्या उपसूचना दिल्या आहेत. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पास धक्का न लावता ५६ कोटी रुपये खर्चाच्या तरतुदी वर्गीकरणाच्या उपसूचना देत हा अर्थसंकल्प अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची शिफारस गुरुवारी स्थायीने केली.
सभेच्या अध्यक्षस्थानी अतुल शितोळे होते. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी मूळ २ हजार ७०७ कोटींचा, तर ‘जेएनएनयूआरएम’सह ३९८२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला. या अर्थसंकल्पावर गुरुवारी स्थायी समिती सभेत चर्चा झाली. या वेळी ५६ कोटी ७७ लाख ५८ हजार रुपयांच्या ३० उपसूचना देण्यात आल्या. या सर्व उपसूचना
तरतुदी वर्गीकरणाच्या आहेत. अर्थसंकल्पात वाढ अथवा घट होणार नाही. तरतुदी वर्गीकरणाच्या उपसूचनांसह या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Approximate 56 crores budget